Vivo चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आज भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Upcoming Smartphones 2024: आज Vivo चा फोल्डेबल फोन X Fold 3 Pro लॉन्च होणार आहे. लॉन्च केल्यानंतर हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जाईल.
Vivo चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आज भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Vivo X Fold3 ProSaam Tv

जर तुम्ही फोल्डेबल फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Vivo फोन एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आम्ही तुम्हाला याच आगामी फोनच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंतची माहिती सांगणार आहोत.

Vivo चा फोल्डेबल फोन X Fold 3 Pro आज म्हणजेच 6 जून 2024 ला लॉन्च होणार आहे. लॉन्च केल्यानंतर हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जाईल. यासह ग्राहक हा फोन Vivo India च्या ऑनलाइन स्टोअर आणि ऑफलाइन रिटेल चॅनेलवरून देखील खरेदी करू शकतात. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, देशात Vivo X Fold 3 Pro साठी किती किंमत निश्चित केली जाईल याची माहिती समोर आलेली नाही.

Vivo चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आज भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
5,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा! नवीन Realme C63 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने हा फोन याआधीच चिनी बाजारात लॉन्च केला आहे. ज्याची चीनी बाजारात किंमत 9,999 युआन (सुमारे 1.17 लाख रुपये) आहे. अशी अपेक्षा आहे की, कंपनी भारतीय बाजारपेठेत या फोनची किंमत सुमारे 1.5 लाख रुपये ठेवू शकते.

कंपनी Vivo X Fold 3 Pro मध्ये 8.03 इंच AMOLED पॅनल देऊ शकते. याचा कव्हर डिस्प्ले 6.53 इंच असू शकतो. याच्या डिस्प्लेमध्ये 2480 x 2200 चे रिझोल्यूशन, तसेच 120Hz चा रिफ्रेश रेट असेल. हा फोन 4500 nits च्या पीक ब्राइटनेस सपोर्टसह येऊ शकतो.

प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर कंपनी या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेट देऊ शकते. ज्यामध्ये 16GB पर्यंत RAM सह 1TB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध असेल. या फोनला पॉवर देण्यासाठी कंपनी यामध्ये 5700mAh बॅटरी देऊ शकते, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर Vivo X Fold 3 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50MP प्रायमरी, 50MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 3x ऑप्टिकल झूमसह 64MP टेलिफोटो लेन्स असतील. यासोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com