Vi वापरकर्त्यांसाठी १ रुपयांत ४,९९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन
अमर्यादित कॉलिंग, ५जी डेटा, ViMTV आणि Amazon Prime मोफत
दररोज २ जीबी डेटा व १०० मोफत एसएमएस, वीकेंड डेटा रोलओव्हर
ऑफर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत Vi गेम्सवर उपलब्ध
व्होडाफोन आयडिया (Vi) ने त्यांच्या यूजर्ससाठी एक खास ऑफर सुरू केली आहे, ज्याअंतर्गत फक्त १ रुपयांत ४,९९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन मिळू शकतो. ही ऑफर Vi गेम्सच्या गॅलेक्सी शूटरचा फ्रीडम फेस्ट एडिशन कार्यक्रमाशी जोडलेली आहे. Vi गेम्स हे टेलिकॉम कंपनीचे लोकप्रिय ऑनलाइन क्लाउड गेमिंग प्लॅटफॉर्म आहे, जिथे या स्पेशल एडिशन फेस्टमध्ये यूजर्सना विविध रिवॉर्ड्स देण्यात येत आहेत.
या फेस्टमध्ये,यूजर्सना ४,९९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन फक्त १ रुपयांमध्ये मिळवता येतो. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी मोबाईल डेटा, १०० मोफत एसएमएस, तसेच अमर्यादित कॉलिंग सुविधा दिली जाते. शिवाय, प्लॅनमध्ये अमर्यादित ५जी डेटा, ViMTV आणि Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे. यूजर्सना मध्यरात्री १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अमर्यादित डेटा उपलब्ध होतो, तसेच वीकेंड डेटा रोलओव्हरचा फायदा देखील मिळतो.
४,९९९ रुपयांचा हा प्लॅन एक वर्षासाठी वैध आहे आणि फक्त १ रुपयाच्या रिचार्जवर यूजर्सना संपूर्ण वर्षभराचे फायदे मिळतात. ही ऑफर Vi यूजर्ससाठी अत्यंत आकर्षक आणि किफायतशीर ठरत आहे. गॅलेक्सी शूटर्स फ्रीडम फेस्ट एडिशन ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत Vi गेम्सवर उपलब्ध राहील.
इतर वैशिष्ट्ये
रिचार्ज प्लॅनव्यतिरिक्त, फेस्टिव्हल ऑफरमध्ये यूजर्ससाठी अनेक आकर्षक रिवॉर्ड्स दिल्या जात आहेत. संपूर्ण रिवॉर्ड्सची यादी आणि तपशील खाली पाहा.
१० जीबी डेटा खरेदीवर १६ ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
५० जीबी डेटा पॅक आता २८ दिवसांसाठी उपलब्ध आहे.
अमेझॉनवर खरेदीसाठी गिफ्ट व्हाउचर आता उपलब्ध आहे.
४,९९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आता ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
सध्या जिओ आणि एअरटेल त्यांच्या काही प्लॅन्स बंद करत आहेत. अशा परिस्थितीत, व्हीआयची नवीन ऑफर दोन्ही कंपन्यांसाठी मोठी आव्हाने निर्माण करू शकते. आता पाहणे गरजेचे आहे की जिओ आणि एअरटेल यावर कसे प्रतिसाद देतील.
Vi चा १ रुपयांचा रिचार्ज प्लॅन काय आहे?
Vi वापरकर्त्यांना फक्त १ रुपयांत ४,९९९ रुपयांचा वार्षिक रिचार्ज प्लॅन मिळतो, ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंग, ५जी डेटा आणि मोफत सबस्क्रिप्शन्स आहेत.
या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतात?
दररोज २ जीबी डेटा, १०० मोफत एसएमएस, अमर्यादित कॉलिंग, अमर्यादित ५जी डेटा, ViMTV आणि Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन, वीकेंड डेटा रोलओव्हर.
ही ऑफर किती दिवस चालू राहील?
गॅलेक्सी शूटर्स फ्रीडम फेस्ट एडिशन ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत Vi गेम्सवर उपलब्ध राहील.
प्लॅनची वैधता किती आहे?
हा वार्षिक प्लॅन संपूर्ण ३६५ दिवसांसाठी वैध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.