
देशातील कोट्यवधी युजर्स यूपीआयचा वापर करतात. आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआयबाबत एक नवीन प्रणाली सादर केली आहे. एनपीसीआयच्या या नवीन सिस्टीममुळे युजर्संना खूप फायदे होणार आहे. आता तुम्ही तुमच्या दोन वेगवेगळ्या फोनवर चालणारे पेमेंट सहजपणे पाहू शकतात. एवढेच नाही तर तुम्ही एका यूपीआय अॅपवरुन दुसऱ्या यूपीआय अॅपवर पैसेदेखील ट्रान्सफर करु शकतात.
यूपीआयच्या या नवीन सिस्टीमचा उद्देश युजर्संना त्यांच्या ऑटोपे पेमेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे. आता युजर्स त्यांच्या सोयीनुसार यूपीआय अॅप निवडू शकतात. यामुळे ऑनलाइन पेमेंट आणखी सोपे होणार आहे.
UPI ऑटोपे नक्की आहे तरी काय?
यूपीआय ऑटोपे म्हणजे ऑटोमॅटिक पेमेंट. यामध्ये तुमचे नियमित बिल, मोबाईल रिचार्च किंवा सब्सक्रिप्शन नियमित आपोआप कट केले जातील. याआधी जेव्हा तुम्ही ऑटोपे करत होता. तेव्हा त्याची माहिती त्या-त्या अॅपवर मिळत होती. आता एनपीसीआयने नवीन नियम लागू केला आहे. यामुळे यूपीआय अॅपवर लॉग इन करुन तुम्ही सर्व अॅपचे मँडेट एकाच ठिकाणी पाहू शकतात.
या नवीन नियमांनुसार, तुम्ही एका अॅपवरुन दुसऱ्या यूपीआय अॅपवर पैसे ट्रान्सफर करु शकतात. याचाच अर्थ असा की तुम्ही गुगल पे आणि फोन पेवर पैसे ट्रान्सफर करु शकतात. ही नवीन सिस्टीम ३१ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. आता तुमच्या गुगल पे आणि फोन पे या दोन्ही अॅपवर ऑटोपे मँडेट अॅक्टिव्ह असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.