RBI चा मोठा निर्णय! कार, स्मार्टवॉच अन् टीव्हीद्वारे करता येणार UPI पेमेंट

Now UPI Payment Through Car, Smartwatch and TV: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज ४ नवीन डिजिटल टूल लाँच केले आहे. यामुळे तुम्ही कार, स्मार्टवॉच आणि टीव्हीद्वारे यूपीआय पेमेंट करु शकतात.
UPI
UPI Saam Tv
Published On
Summary

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावने लाँच केले नवीन टूल

आता कार, स्मार्टवॉचद्वारे करता येणार UPI पेमेंट

डिजिटल पेमेंट आणखी जलद आणि सुरक्षित होण्याच्या दृष्टीने निर्णय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिजिटल पेमेंटसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. आरबीआयने ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये चार नवीन डिजिटल टूल लाँच केले आहे. यामुळे ऑनलाइन पेमेंट अजून स्मार्ट आणि जलद होणार आहे.

UPI
RBI Repo Rate: दिवाळीआधी सर्वसामान्यांना खुशखबर मिळणार! होम, कार लोन पुन्हा स्वस्त होणार, SBI कडून मिळाले संकेत

आरबीआयच्या या टूलमुळे ग्राहकांना खूप फायदा होणार आहे. या टूल्समुळे आता अवघ्या काही सेकंदात तुम्ही पेमेंट करु शकणार आहात. याचसोबत तुमची जर काही तक्रार असेल तर ती पण नोंदवू शकतात. तुम्ही स्मार्टवॉच, कारमधूनदेखील यूपीआय पेमेंट करु शकतात. यामुळे डिजिटल पेमेंट आणखी सोपे होणार आहे.

AI-Based UPI HELP

हे नवीन टूल एआयला सपोर्ट करणार आहे. यामध्ये तुमच्या यूपीआय ट्रान्झॅक्शनच्या तक्रारी किंवा त्या मॅनेजर करण्यासाठी एआय मदत करणार आहे. यासाठी आरबीआयने स्वतः ची टीम तयार केली आहे. सध्या ही सुविधा इंग्रजीत आहे. येत्या काही दिवसांत स्थानिक भाषांमध्येही ही सुविधा सुरु होईल. या प्लॅटफॉर्मवरुन तुम्ही तुमच्या ट्रान्झॅक्शनची स्थिती चेक करु शकतात.

कारमधून करता येणार पेमेंट

आता तुम्हाला पेट्रोल भरण्यासाठी पेमेंट करताना मोबाईल काढण्याची गरज नाही. IoT Payments म्हणजे इंटरनेट ऑथ थिंग्स आधारित पेमेंट सिस्टीममुळे यूजर्स थेट कनेक्टेड कार, स्मार्टवॉच, स्मार्ट टीव्हीद्वारे पेमेंट करु शकतात.

बँकिंग कनेक्ट

बँकिंग कनेक्ट ही सुविधा NPCI Bharat BillPay Limited (NBBL) ने सुरु केली आहे. यामुळे तुमची डिजिटल बँकिंग सुविधा अधिक सोपी आणि जलद होणार आहे.

UPI
RBI Rule: फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर

UPI Reserve Pay

आता तुम्हाला ई कॉमर्स शॉपिंग, फूड ऑर्डर किंवा कॅब बुक करताना नेहमी ओटीपी देण्याची गरज भासणार नाही. यासाठी UPI Reserve Pay सुविधा सुरु केली आहे. यामुळे तुम्हालाच फायदा होणार आहे.

UPI
UPI Rule: सरकारचा मोठा निर्णय! UPI च्या नियमांत मोठा बदल, उद्यापासून होणार लागू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com