व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

WhatsApp subscription : तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत...होय, व्हॉट्सअॅपसाठीही पैसे मोजावे लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Whatsapp News
whatsapp Saam Tv News
Published On

व्हॉट्सअॅप आता लवकरच सबस्क्रिप्शन मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे...होय, स्टेटस आणि चॅनेलमध्ये दिसणाऱ्या जाहिराती टाळण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागू शकतात असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच आता व्हॉट्सअॅप साठी पैसे मोजावे लागणार आहेत का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, राज्यात कोट्यवधी लोक व्हॉट्सअॅप वापरतात...याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये का दावा केलाय पाहुयात...

येत्या काही दिवसांत तुम्हाला व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील. कंपनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जाहिरात-मुक्त सबस्क्रिप्शन मॉडेलची चाचणी घेतेय.युजर्सना अपडेट टॅबमध्ये जाहिराती दिसतील.

हा मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी एक्सपर्टचा सल्ला घेतला...त्यांनी काय म्हटलंय पाहुयात...

Whatsapp News
Arijit Singh Retirement : मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; अरिजीत सिंगने रिटायरमेंट घेतली, प्लेबॅक सिंगर म्हणून गाणार नाही

व्हायरल सत्य काय?

व्हॉट्सअॅप सबस्क्रिप्शन मॉडेल आणण्याच्या तयारीत

भविष्यात व्हॉट्सअॅप पैसे आकारू शकतो

व्हॉट्सअॅपने अशा गाईडलाईन्स दिलेल्या नाहीत

ग्राहक आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअॅप फ्री दिलंय

चॅटिंग पूर्वीप्रमाणेच मोफत राहण्याची शक्यता

Whatsapp News
सारखा गावभर फिरत राहतोस; वडील मुलावर संतापले, बारावीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं

जे पैसे भरणार नाहीत, त्यांना जाहिराती पाहाव्या लागतील. मात्र, चॅटिंग पूर्वीप्रमाणेच मोफत राहण्याची शक्यता आहे...तर, जाहिरातमुक्त अनुभवासाठीच हे शुल्क आकारलं जाईल अशी माहिती आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हॉट्सअप चॅटिंगसाठी पैसे मोजावे लागतील हा दावा असत्य ठरलाय. भविष्यात व्हॉट्सअॅप उघडताना जाहिराती मात्र, दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com