सोन्याच्या दरांनी आज पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली आहे. प्रति तोळा सोन्याची किंमत तब्बल ७३ हजारांच्या पार पोहचली आहे. त्यामुळे आज सोने खरेदी करताना सामान्य व्यक्तींच्या खिशाला नक्कीच कात्री लागणार आहे. आज सोन्याचा भाव वाढला असला तरी चांदी मात्र कालच्या किंमतींवर स्थिर आहे. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत, त्याची माहिती जाणून घेऊ.
२२ कॅरेटचा आजचा भाव
आज २२ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव तब्बल ५ हजार रुपयांनी वाढला असून किंमत ६,७२,५०० रुपये इतकी आहे. १० ग्राम म्हणजे १ तोळा सोन्याची किंमत आज ६७,२५० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याची किंमत ५३,८०० रुपये आहे. तर १ ग्राम सोन्याची किंमत आज ६,७२५ रुपये इतकी आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत किती?
२४ कॅरेट १०० ग्राम सोन्याच्या किंमतीत ५,५०० रुपयांनी वाढ झालीये. त्यामुळे आज १०० ग्रामचा भाव ७,३३,५०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव आज ७३,३५० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव ५८,६८० रुपये आहे. १ ग्राम सोन्याचा भाव ७,३३५ रुपयांवर आहे.
१८ कॅरेटचा भाव काय?
१०० ग्राम १८ कॅरेट सोन्याची किंमत ५,५०,२०० रुपये आहे. तर १० ग्रामचा भाव ५५,०२० रुपये आहे. ८ ग्रामचा भाव ४४,०१६ रुपये इतका आहे. तसेच १ ग्राम सोन्याची किंमत ५,५०२ रुपयांवर पोहचली आहे.
विविध शहरांतील १ ग्रान सोन्याचा आजचा भाव काय?
मुंबई
२२ कॅरेट - ६,७१० रुपये
२४ कॅरेट - ७,३२० रुपये
पुण्यात
२२ कॅरेट - ६,७१० रुपये
२४ कॅरेट - ७,३२० रुपये
जळगावमध्ये
२२ कॅरेट - ६,७१० रुपये
२४ कॅरेट - ७,३२० रुपये
नागपुरात
२२ कॅरेट - ६,७१० रुपये
२४ कॅरेट - ७,३२० रुपये
नाशिकमध्ये
२२ कॅरेट - ६,७१३ रुपये
२४ कॅरेट - ७,३२३ रुपये
अमरावीत
२२ कॅरेट - ६,७१० रुपये
२४ कॅरेट - ७,३२० रुपये
चांदीचा भाव पाहू
आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा भाव कालच्या सारखाच आहे. काल चांदीचा भाव ८७,००० रुपये किलो होता. आज देखील राज्यातील विविध शहरांमध्ये चांदीचा भाव ८७,००० रुपये इतकाच आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.