Agriculture News: आनंदाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार बोनस; दोन दिवसांत खात्यात खटाखट पैसे येणार

Agriculture News for Paddy Farmers: आता धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळणार आहे. धान उत्पादन शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता या निधीचे वाटप होणार आहे.
Agriculture News
Agriculture NewsSaam Tv
Published On

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता गेल्या सहा महिन्यांपासून बोनसची प्रतीक्षा आता संपली आहे. आता शेतकऱ्यांना शासनाने जिल्ह्यासाठी १८० कोटी ६३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शासकीय धान केंद्रावर धान विक्री करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना हा बोनस मिळणार आहे. याबाबतची घोषणा नागपूर येथील हिवाळी अधिवेशन २०२४ मध्ये करण्यात आली होती. दोन हेक्टर शेतीसाठी वीस हजार रुपये याप्रमाणे बोनस देण्यात येणार आहे. परंतु ही घोषणा होऊन तीन महिने झाले. त्यानंतर आता ही अंबलबजावणी होण्यास सुरुवात झाली आहे.

Agriculture News
Government Scheme: मुलीच्या नावावर ५,००० ₹ गुंतवा, मॅच्युरिटीनंतर मिळतील २७ लाख; सरकारची भन्नाट योजना

दरम्यान, याबाबत अंबलबजावणी झाली आहे मात्र हा निधी खात्यावर कधी जमा होणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना हा बोनस याआधीच मिळायला हवा होता. मात्र, हा बोनस मिळण्यास उशिर झाल्याचही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार शेतकरी या बोनससाठी पात्र आहेत. त्यासाठी १८० कोटी ६३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी १८ तारखेपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Agriculture News
Water Scheme Scam : म्हैसाळ सिंचन योजनेत साडेदहा लाखांचा घोटाळा; ठेकेदारावर गुन्हा दाखल

आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली आहे. या नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनाच हा बोनस मिळणार आहे. यासाठी यादींची पडताळणीदेखील केली आहे. एकूण २५ लाख क्विंटल धान खरेदी केले आहे. नोंदणी करणारे शेतकरी १ लाख ५६ हजार ४३२ आहेत. फेडरेशनला ७६,२३४ शेतकऱ्यांनी धान विक्री केली आहे. या शेतकऱ्यांसाठी १८० कोटी ६३ लाख ५६ हजार रुपये बोनस रक्कम जाहीर करण्यात आली आहे.

Agriculture News
LIC Scheme: दररोज १५० रुपये भरा अन् १९ लाख मिळवा; LIC ची भन्नाट योजना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com