Success Story: खिशात फक्त १२०० रुपये घेऊन मुंबईत आला, आज आहे ३०० कोटींचा मालक

Success Story of Actor Kapil Sharma: कपिल शर्मा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार आहे. त्याने सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल केला होता.
Kapil Sharma
Kapil SharmaSaam Tv
Published On

मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. मुंबईत अनेकजण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. कोणी हिरो बनण्यासाठी येते तर कोणी शिक्षणासाठी येते.परंतु मुंबईत आल्यावर खूप कष्ट करावे लागतात. अनेकदा तर राहण्यासाठी घर नसते, रेल्वे स्टेशन किंवा फुटपाथवर झोपावे लागते. असाच स्ट्रगल हा कॉमेडी किंग कपिल शर्मानेदेखील केला होता. कपिल शर्मा फक्त १२०० रुपये घेऊन मुंबईत आला होता. आज तो ३०० कोटींचा मालक आहे.

Kapil Sharma
Success Story: आईपण भारी देवा! प्रेग्नंट असताना दिली स्पर्धा परीक्षा, पहिल्याच प्रयत्नात IPS; शहनाज इलियास यांचा प्रेरणादायी प्रवास

कपिल शर्माचा प्रवास (Actor Kapil Sharma Journey)

कपिल शर्मा मूळचे पंजाबच्या अमृतसरचे रहिवासी आहे. त्यांचे वडील हे पोलिस होते. खूप लहान वयातच त्यांचे निधन झाले. कपिलला नोकरी करण्याची ऑफर मिळाली होती. परंतु लहानपणापासूनच त्यांना गायक व्हायचे होते. परंतु त्यांच्या नशिबात कॉमेडीचा सुपरस्टार होणे लिहले होते.

कपिल शर्माने अमृतसरच्या एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याआधीच तो मुंबईत आला आणि मुंबईचाच झाला.

मिडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्माने फक्त १२०० रुपये खिशाल घेऊन मुंबई गाठली. त्यांना काही कामे मिळाली नाही. त्यानंतर तो पुन्हा पंजाबला गेला. यानंतर ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजचे ऑडिशन सुरु होते.पहिल्यांदा ते रिजेक्ट झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा ऑडिशन दिले. यावेळी त्याचे सिलेक्शन झाले.आणि त्या दिवसानंतरच कपिल शर्माचे नशीब पालटले.

हा शो जिंकल्यानंतर त्यातून मिळालेल्या प्राइज मनीमधून त्याने आपल्या बहिणीचे लग्न केले. यानंतर कपिलने अनेक कॉमेडी शो केले.कपिल शर्माने मुंबईत 'K9’ नावाचे प्रोडक्शन हाउस सुरु केले. त्यानंतर त्याने द कॉमेडी नाइट्स विद कपिल लाँच केले. त्यानंतर द कपिल शर्मा शो सुरु केला.

Kapil Sharma
Success Story: ब्युटी विथ ब्रेन! डान्स अन् अभिनयाची आवड जोपासत केली UPSC क्रॅक; IPS श्रृती अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

कपिल शर्माची नेटवर्थ (Kapil Sharma Net Worth)

कपिल शर्माची संपत्ती ३३० कोटी रुपयांनी आहे. याचसोबत त्याच्याकडे १.२५ कोटी रुपयांची वॉल्वो XC90 आहे. मर्सिडीज बेंज S350 CDI आहे. याची किंमत १.२०कोटी आहे. तसेच पंजाबमध्ये २५ कोटींचा फार्महाउस आणि मुंबईत १५ कोटींचे घर आहे.

Kapil Sharma
Success Story: आईपण भारी देवा! UPSC च्या अभ्यासासाठी मुलापासून राहिली २ वर्षे दूर; मिळवली २ रँक; IAS अनु कुमारी यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com