SIP Calculator: दररोज फक्त १०० रुपये गुंतवा अन् ४ कोटी मिळवा; SIPचं कॅल्क्युलेशन वाचा

SIP Investment Calculation for 4 Crore: एसआयपी म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान. एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. यामध्ये तुम्ही दिवसाला १०० रुपये गुंतवून ४ कोटी रुपये मिळवू शकतात.
SIP Calculator
SIP CalculatorSaam tv
Published On
Summary

SIP मधील गुंतवणूक फायदेशीर

दररोज १०० रुपये गुंतवा अन् ४ कोटी कमवा

SIP चं कॅल्क्युलेशन वाचा

नोकरदार वर्गाला नेहमी भविष्याची चिंता असते. सध्या दर महिन्याला येणाऱ्या पगारातून सर्व काही व्यवस्थित सुरु आहे. परंतु भविष्यात सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पगार येणार नाही. त्यावेळी काय करावे, याची चिंता आतापासूनच सतावत असते. त्यामुळे प्रत्येकजण काही न काही गुंतवणूक करत असतात. सध्याच्या काळात गुंतवणूकीशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाला आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी लहान प्रमाणात का होईना बचत ही करावी लागते. यासाठी सर्वात बेस्ट फॉर्म्युला म्हणजे एसआयपी. तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळणार आहे. दररोज फक्त १०० रुपये गुंतवून तुम्ही कोट्यवधी रुपये कमवू शकतात.

SIP Calculator
Pension Schemes: ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार पेन्शन; वाचा सविस्तर

SIP मधील गुंतवणूक फायदेशीर (SIP Investment Benefits)

SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान. तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला एसआयपीमध्ये एक ठरावीक रक्कम गुंतवायची असते. या रक्कमेवर शेअर मार्केटनुसार तुम्हाला परतावा मिळतो. म्हणजेच तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात यावर किती परतावा मिळणार हे ठरलेले असते.

SIP Calculator
LIC New Scheme: नवीन वर्षात LIC चं मोठं गिफ्ट, नवी योजना केली लाँच; मिळणार आयुष्यभराचा विमा

दिवसाला १०० रुपये गुंतवा अन् ४ कोटी मिळला (Invest Daily 100 Rupees and Get 4 Crore)

म्युच्युअल फंडात (Mutual Fund Investment) तुम्हाला लाँग टर्मसाठी गुंतवणूक करावी लागेल. त्यावर जरी तुम्हाला सरासरी १५ टक्के परतावा मिळाला तर चांगली रक्कम मिळू शकते. प्रत्येक महिन्याच्या गुंतवणूकीवर व्याज मिळते. तसेच दर महिन्याला तुमच्या गुंतवणूकीची रक्कम वाढत जाते. जर १५ टक्के परतावा मिळाला तर तुम्ही कोट्यवधी रुपये मिळवू शकतात.

तुम्हाला ३० वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर दर दिवासाली १०० रुपये जमा करा. दिवसा १०० रुपये म्हणजे महिन्याला ३००० रुपये गुंतवायचे आहेत. ही रक्कम तुम्हाला पुढच्या वर्षी ३०० रुपये वाढवायची आहे. म्हणजेच एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार तुम्ही ३० वर्षात एकूण ५९.२२ लाख रुपये जमा करणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला दर महिन्याला गुंतवणूकीची रक्कम वाढवावी लागणार आहे. जेव्हा तुम्ही ही रक्कम वाढवणार तेव्हा त्यावर मिळणारे व्याजदेखील वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही किती रक्कम गुंतवता त्यावर किती व्याज मिळते यावरुन तुम्हाला किती रक्कम मिळणार हे समजते.

SIP Calculator
Post Office Scheme: पोस्टाची सुपरहीट योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून महिन्याला ₹५५०० मिळवा

यावर तुम्हाला ३ कोटी ५८ लाख ९१५ रुपये मिळणार आहे.३० वर्षानंतर तुम्हाला मॅच्युरिटीवर ४,१७,६३,७०० रुपये मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण ४.१७ कोटी रुपये मिळणार आहेत.

टीप- एसआयपीमधील गुंतवणूकीवरील व्याजदर नेहमी बदलत असते. त्यामुळे गुंतवणूकीआधी आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घ्या.

SIP Calculator
Post Office Scheme : एक लाख गुंतवा अन् व्याजातून ₹४४,९९५ मिळवा; पोस्टाच्या भन्नाट योजनेचं कॅल्क्युलेशन वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com