Silver Rate Today: ऐन दिवाळीत महागाईचा भडका! चांदीचे दर २ लाखांच्या पार; वाचा तुमच्या शहरातील भाव

Silver Price Today: सोन्यानंतर आता चांदीच्याही दरात वाढ होताना दिसत आहे. प्रति किलो चांदीचे दर २ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे आता चांदी खरेदी करायची की नाही असा प्रश्न पडत आहे.
Silver Rate Today
Silver Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्यासोबत चांदीच्या दरानेही उच्चांक गाठला

चांदीचे दर २ लाखांच्या घरात

प्रति किलोमागे मोजावे लागतायत लाखो रुपये

दिवाळीआधी सोन्याचे दर वाढताना दिसत आहेत. सोन्यासोबतच चांदीचेही दर वाढले आहेत. चांदीचे दर काल चेन्नईत प्रति किलो जवळपास २ किलोच्या आसपास केले आहेत. एकाच दिवसात चांदीचे दर १०,००० रुपयांनी वाढले आहेत. तर इतर राज्यांमध्येही चांदीचे दर २ लाखांच्या आसपास गेले आहे. ऐन दिवाळीच्या आधी सोने-चांदीचे दर वाढल्याने ग्राहकांना मोठा प्रश्न पडला आहे. आता सोने घेणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यानंतर आता चांदीचेही भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे चांदी खरेदी करावी की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे.

Silver Rate Today
Today's astrology prediction: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार एकदम खास; पाहा काय आहेत आजचे शुभ मुहूर्त

चांदीचे दर का वाढलेत?

चांदीचे दर लगातार वाढत आहे. जगभरात चांदीची मागणी सातत्याने वाढत आहे. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि सोलर पॅनल बनवण्यासाठी चांदी वापरली जाते. त्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर वाढत आहे. याचा परिणाम भारतातदेखील होताना दिसत आहे. भारतातदेखील चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.

चांदीचे दर

सध्या चांदीचे दर १,९०,००० रुपये प्रति किलो आहे. तर चेन्नईत चांदीचे दर सर्वाधिक वाढले आहे. चेन्नईत १ किलो चांदी १,०७,००० रुपयांवर विकली जात आहे. चांदीच्या दरात १०,००० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे चांदीच्या दरांनीही आता २ लाखांचा टप्पा पार केला आहे.सोन्याचे दर प्रति तोळा १,३०,००० रुपयांच्या घरात आहेत तर प्रति किलो चांदी २ लाखांपेक्षा जास्त आहे.

Silver Rate Today
Gold Rate Today: दिवाळीच्या आठवडाभरापूर्वीच सोन्याने उच्चांक गाठला; १० तोळ्यामागे ३२०० रुपयांनी वाढ; वाचा सविस्तर

१ किलो चांदीचे दर (1 kg Silver Rate)

मुंबई १,९०,००० रुपये

दिल्ली १,९०,००० रुपये

अहमदाबाद १,९०,००० रुपये

चेन्नई २,०७,००० रुपये

कोलकत्ता १,९०,००० रुपये

गुरुग्राम १,९०,००० रुपये

लखनऊ १,९०,००० रुपये

बंगळुरु १,९३,७०० रुपये

Silver Rate Today
Gold Rate Today: सोन्याची दिवाळी! १० तोळ्यामागे ७१०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com