सोमवारी शेअर मार्केट उघडताच गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी शेअर मार्केट उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांक गाठला आहे. निफ्टीने इतिहासात पहिल्यांदाच २५,९०० चा टप्पा पार केला आहे तर सेन्सेक्सही ८४,८०० च्या पार गेला आहे. निफ्टी बँकेत वाढ जाली आहे.
आज मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्येही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. टाटा स्टील, एचडीएफसी लाइम, ग्रासिम हे शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तर वोडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आज सकाळपासूनच सेनसेक्स ८४,८२५ अंकाच्या जवळ व्यव्हार करत आहे तर NSE निफ्टी ५० १०६ अंकानी वाढला आहे. निफ्टी २५,८९८.२५ वर व्यव्हार करत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा होणार आहे.
सेन्सेक्समधील अनेक शेअर्समध्ये विक्रमी वाढ झाली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra And Mahindra Shares), भारती एअरटेल, एनटीपीसी (NTPC), एसबीआय (SBI) बँकेच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. त्याचसोबत टाटा स्टील (Tata Steel), बजाज फीनसर्व्ह (Bajaj Fineserv), टायटन (Titan Shares), एचडीएफसी बँक,टीसीएस,टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.
आज आयसीआय बँक (ICICI Bank), एचसीएल टेक (HCL Tech), इन्फोसिस, इंडसइंड बँक,अॅक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये तब्बल १.३० टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.