Amravati Airport : अमरावती विमानतळाहून ऑगस्टमध्ये 'टेक ऑफ'; विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात

Amravati News : अमरावती शहरात विमानतळ बांधकामास सुरवात करण्यात आली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील कामाचा वेग मंदावला होता.
Amravati Airport
Amravati AirportSaam tv

अमर घटारे  
अमरावती
: गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्यावतीने हे विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. जुलैअखेर किंवा ऑगस्ट महिन्यात या विमानतळावरून उड्डाण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Amravati Airport
Parbhani News : जूनमध्येही कापसाची खरेदी; सेलूत पाच लाख क्विंटल कापूस खरेदी

अमरावती (Amravati) शहरात विमानतळ बांधकामास सुरवात करण्यात आली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील कामाचा वेग मंदावला होता. दरम्यान माजी मंत्री सुनील देशमुख यांनी बेलोरा विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार आता काम पूर्णत्वास होत आले आहे. विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाले, तर टर्मिनल इमारतीसह अन्य कामे सुरू आहेत. येत्या दीड- दोन महिन्यात (Airport) विमानतळाचे संपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.  

Amravati Airport
Narayangaon Bajar samiti : टोमॅटोला हंगामातील उच्चांकी भाव; नारायणगाव उपबाजारात ७०० रुपयांपेक्षा जास्त दर

अनेक वर्षांपासून सुरु असलेले काम पूर्णत्वास येत असून या विमानतळावरून देखील विमानाचे उड्डाण लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान एटीआर- ७२ किंवा इतर विमान अमरावती विमानतळावरून टेक ऑफ करू शकतात. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. येथे पोलिस चौकीही बांधण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com