सॅमसंग कंपनी स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध आहे. सॅमसंगने आजवर स्मार्टफोनमधील फीचर्समध्ये अनेक प्रगती केली आहे. आता सॅमसंगने एक नवीन नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. या नवीन मॉडेलचे नाव Samsung Galaxy A06 असे आहे.
Samsung Galaxy A06 या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये 64GB स्टोरेज देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनचा 4GB + 128 GB व्हेरिएंट 11,499 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन लवकरच ऑनलाइन विकत घेता येणार आहे.
6.7 इंचाचा IPS LCD पॅनेल HD+ रिझोल्यूशनसह यात आहे.
60 HZ चा रिफ्रेश रेट उपलब्ध आहे.
या फोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट आणि Mali-G52 MP2 GPU वापरण्यात आला आहे.
फोनला 4 GB रॅम आहे.
128 GB इंटरनल स्टोरेज तर 1 TB पर्यंतचे मायक्रोएसडी कार्ड फोनमध्ये उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनला फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सिस्टम देण्यात आली आहे.
Samsung Galaxy A06 मध्ये 50MP फ्रंट कॅमेरा तर 2MP सेकंड कॅमेरा आहे. तर 8MPचा सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Samsung Galaxy A06 स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसह येते. यात ब्लूटूथ v5.3 GPS आणि USB Type-C पोर्ट देखील आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.