Rule Change: LPG गॅस ते ATM मधून पैसे काढणे; १ मेपासून ५ नियमांमध्ये होणार मोठा बदल; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम

Rule Change From 1st May 2025: १ मे २०२५ पासून पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. यामध्ये एटीएम, एफडीवरील व्याजदर याचा समावेश आहे.
Rule Change
Rule ChangeSaam Tv
Published On

मे महिन्यात पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. यामध्ये एटीएमपासून ते एलपीजी गॅसचा समावेश आहे. यामध्ये एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होणार आहेत. त्यामुळे तुमचे मे महिन्याचे बजेट कोलमडू शकते. १ मे २०२५ पासून कोणकोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत ते जाणून घ्या.

१. एटीएममधून कॅश काढणे महागणार (ATM Cash Withdrawal)

१ मे २०२५ पासून एटीएममधून कॅश काढणे महागणार आहे. आता तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. तुम्ही एकदा फ्री लिमिट झाल्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. तुम्हाला कॅश काढण्यासाठी १९ रुपये प्रति व्यव्हार मोजावे लागणार आहे.

Rule Change
RBI: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! एटीएममधून पैसे काढणे आता महागणार; व्यवहार शुल्कात केली वाढ

२. रेल्वेच्या नियमांत बदल (Railway Rule Change)

रेल्वेच्या तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल होणार आहे. यामध्ये १ मेपासून वेटिंग तिकीट स्लीपर आणि एसी कोचमध्ये मान्य राहणार नाही. फक्त जनरल डब्ब्यांमध्येच तुम्ही वेटिंग तिकीटावर प्रवास करु शकतात. तसेच रिझर्व्हेशनचा कालावधी ६० दिवस केला आहे. याआधी तो १२० दिवस होता.

३. एलपीजी गॅसच्या किंमती (LPG Price Change)

दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होतो. त्यामुळे मे महिन्यातदेखील एलपीजी गॅसच्या किंमती कमी-जास्त होऊ शकतात.

४. एफडी खात्यात महत्त्वाचा बदल (FD Rule Change)

१ मे २०२५ पासून सेव्हिंग आणि एफडी खात्यांमध्ये बदल होऊ शकतात. यामध्ये व्याजदरदेखील बदलू शकतात. बँका त्यांचे व्याजदर वाढवू किंवा कमी करु शकते. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Rule Change
ATM News: ATM मधून पैसे काढणे महागणार, बॅलन्स चेक केला तरी अकाउंट बॅलन्स कमी होणार, VIDEO

5. ग्रामीण बँकेचे विलीनीकरण

१ मे २०२५ पासून ११ राज्यांमधील प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या विलीनीकरणाची योजना लागू केली जाईल. एक राज्य एक आरआरबी असं या योजनेचं नाव आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर अशा अनेक राज्यांचा समावेश आहे.

Rule Change
EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बेसिक पेन्शन ७५०० रुपये होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com