Rule Change: एज्युकेशन लोन ते TDS; 'या' नियमांमध्ये होणार १ एप्रिलपासून मोठा बदल; सर्वसामान्यांना दिलासा

Rule Change From 1st April: १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. या नवीन आर्थिक वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. ज्यामुळे तुमच्या बजेटवर परिणाम होणार आहे.
Rule Change
Rule ChangeSaam Tv
Published On

आर्थिक वर्ष २०२४-२५ संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. त्यामुळे अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामुळे तुमच्या आर्थिक बजेटवर परिणाम होणार आहेत. तुमच्या पैशांच्या संबंधित कामांवर परिणाम होणार आहे. १ एप्रिलपासून टॅक्सपासून ते टीडीएसपर्यंतच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे करदात्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे.

Rule Change
Income Tax Bill: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नवीन आयकर विधेयक केले सादर; काय बदल होणार? जाणून घ्या

१ एप्रिलपासून कोणते नियम बदलणार? (Rule Change From 1st April 2025)

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात टीडीएसबाबत मोठी घोषणा केली होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस कपात दुप्पट करण्याची घोषणा केली होती. पूर्वी तुम्हाला ५०,००० रुपयांच्या उत्पन्नावर टीडीएस भरावा लागत होता. आता ही रक्कम १ लाख रुपये झाली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता ज्या ज्येष्ठ नागरिकांना १ लाख रुपये मिळतात, त्यांनाच फक्त टीडीएस भरावा लागणार आहे.

घरमालकांना दिलासा

तसेच आता घरमालकांनाही दिलासा मिळणार आहे. ज्या नागरिकांनी आपले घर भाड्याने दिले आहे त्यांना भाड्यातून मिळणाऱ्या टीडीएस कपातीची मर्यादा २.४ लाखांवरुन ६ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्ही जर भाड्यातून ६ लाख रुपये कमवत असाल तरच तुम्हाला टीडीएस भरावा लागणार आहे.

Rule Change
Chhaava Tax Free: मध्य प्रदेशात 'छावा' टॅक्स फ्री, CM मोहन यादव यांची मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय व्यव्हारांवर टिसीएस (TCS) मर्यादा वाढवली

आता परदेशातून व्यव्हार करणाऱ्यांसाठी आरबीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लिब्रलाइज्ड रिमिटेंस स्कीममध्ये टिसीएस कपातीची लिमिट वाढवण्यात आली आहे. याआधी ७ लाखांपर्यंतच्या व्यव्हारांवर टिसीएस लागत होता. दरम्यान ही मर्यादा आता १० लाख करण्यात आली आहे.

एज्युकेशन लोनवरील टीडीएस हटवला (Education Loan)

एज्युकेशन लोनवरील TCS कपात केली आहे. ७ लाखांपेक्षा अधिकच्या एज्युकेशन लोनवर ०.५ टक्के TCS कापला जायचा. दरम्यान आता हा हटवण्यात आला आहे.

Rule Change
Tax Saving : 80C अंतर्गत फायदा, १.५ लाखांपर्यंत वाचवा टॅक्स; कुठे कुठे गुंतवणूक कराल? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com