RTE प्रवेशासाठी रविवारपर्यंत मुदत, २५ टक्के राखीव जागांसाठी अडीच लाख अर्ज

RTE Admission Application Date: RTE प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. आता तुम्ही फक्त रविवारपर्यंतच अर्ज करु शकणार आहात. त्यामुळे जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर करावा.
RTE Admission Application Date
RTE Admission Application DateSaam Tv
Published On

आरटीईअंतर्गत मुलांच्या प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी अडीच लाखांपेक्षा जास्त अर्ज आले आहे. यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख येत्या रविवारपर्यंत आहे. त्यामुळे अजूनही ज्यांनी अर्ज केले नाहीत ते रविवारपर्यंत अर्ज करु शकतात. (RTE Admission)

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. यात राज्यातील ८८६३ शाळांमधील एकूण १ लाख नऊ हजार १११ रिक्त जांगासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. त्यासाठी आतापर्यंत दोन लाख ६१ हजार ३०७ अर्ज आले आहेत.

RTE Admission Application Date
Pune GBS News: पुण्यात गुलियन बॅरी सिंड्रोम का पसरतोय? तुमच्या घरात येणाऱ्या पाण्याशी आहे कनेक्शन

या प्रक्रियेअंतर्गत लहान मुलांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे येत्या रविवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (२००९) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी १४ ते २७ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती.

RTE Admission Application Date
Pune Crime: एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, पुण्यात ६० लाख रूपयांची फसवणूक

दरम्यान, अधिकाधिक पालकांच्या बालकांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी आता रविवारपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.त्यामुळे, पालकांनी आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावेत. ही अंतिम मुदतवाढ असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही.

आरटीई म्हणजे Right To Education. याअंतर्गत प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. त्यामुळेच बालकांच्या अॅडमिशनसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया केली जाते. त्यामुळे दरवर्षी वेगवेगळ्या शाळांमध्ये अर्ज करावे लागतात. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्या

RTE Admission Application Date
MSSC Scheme Benefits: बायकोच्या नावानं २ लाख रुपये गुंतवा; मिळणार ३२००० रिटर्न, काय आहे योजना!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com