
शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळाला पाहिजे. त्यांच्या व्यक्तीगत जीवनात काही संकट असतील. त्यांच्या संकटामुळे तो ज्ञान संपादन करण्यापासून थांबवू नये,यासाठी आपण अशा संस्था चालवतो, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणालेत. विद्या प्रतिष्ठानच्या 'अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल'च्या नवीन वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. (Latest News)
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलची वास्तू उद्धाटनावेळी बोलताना शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठान संस्थेची कशी उभारणी झाली याची माहिती दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राजकारणात दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर चांगले काम करण्याचं ठरवलं हरिभाऊ देशपांडे, दत्त ओमराज शहा,शरद वाडकर, आदी लोकांचा आमचा संच होता. आम्ही एकत्र बसून शिक्षण संस्था काढण्याचं ठरवलं. यासाठी मार्गदर्शन कोणाचं घ्याचं हा विचार करू लागलो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी येथील मुख्याध्यापक होते. त्यांचे नाव व्ही. जी. घाणे यांचा सल्ला घेतला,त्यानंर विद्या प्रतिष्ठानची उभारणी केली. विद्या प्रतिष्ठान १९७२ झाला काढली आज या संस्थेला ५२ वर्ष झाल्याचे शरद पवार म्हणाले.
या संस्थेच्या शाळेतील अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करत आहे. या संस्थेच्या शाळेतील विद्यार्थांना इंग्रजीतून न्याय मिळावं यासाठी आज विद्या प्रतिष्ठानची इंग्रजी माध्यमातील ही शाळा इथं उभारलीय याचा आनंद असल्याचं शरद पवार म्हणाले. विद्या प्रतिष्ठान आणि कृषी प्रतिष्ठान येथील कृषी महाविद्यालय यांचे अर्टिफिशल इंटेलिजन्समध्ये योगदान अधिक आहे. जगामध्ये शिक्षण क्षेत्रा खूप बदल होत आहेत. या एआय मार्फत उस शेतीसाठी फायदा होईल. उसामध्ये साखर किती आहे. त्यांची तोडणी कधी केली पाहिजे.
हे या एआयच्या माध्यमातून आपल्याल कळेल. शेतातील संकट कधी येतील याची माहिती सुद्धा यातून समजेल. यामुळे या दोन्ही संस्था यात कशा प्रकारे काम केले पाहिजे त्याची काळजी घेतील. या भागातील शेती, दुग्धव्यवसाय, असो इतर कोणते क्षेत्र असो या सर्वांचा विकास कसा होईल याची माहिती यातून मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.