Royal Enfield ने जाहीर केली नवीन Price लिस्ट; Meteor मॉडेल्ससह सर्व बाईकची नवीन किंमत, वाचा सविस्तर

Bike Price Update: रॉयल एनफिल्डने 2025 साठी नवीन किंमत यादी जाहीर केली आहे. मिटीअर, क्लासिक, हंटर आणि इतर सर्व बाईक मॉडेल्सच्या अपडेटेड किंमती आता भारतातील अधिकृत स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.
Royal Enfield ने जाहीर केली नवीन Price लिस्ट; Meteor मॉडेल्ससह सर्व बाईकची नवीन किंमत, वाचा सविस्तर
Published On

भारतात क्रूझर बाईक्सची लोकप्रियता नेहमीच मोठ्या प्रमाणावर राहिली आहे आणि या सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्डचे वर्चस्व मानले जाते. जावा आणि येझदीसारख्या ब्रँड्स बाजारात असले तरी विक्रीच्या बाबतीत रॉयल एनफील्ड सतत आघाडीवर राहिले आहे. त्यांच्या बाईक्स महाग असल्या तरी विशेष फॅन फॉलोइंगमुळे ही कंपनी ग्राहकांमध्ये नेहमीच चर्चेत असते. मात्र, सरकारने अंमलात आणलेल्या GST 2.0 मुळे आता 350cc श्रेणीतील या लोकप्रिय बाईक्सच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे आणि त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पूर्वी मोटरसायकल आणि स्कूटरसह सर्व 2-व्हीलर वाहनांवर 31% कर (28% GST + 3% सेस) आकारला जात होता. पण नवीन बदलानुसार 350cc पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या सर्व 2-व्हीलर्सना केवळ 18% GST भरावा लागणार आहे. याचाच थेट फायदा हंटर 350, बुलेट 350, क्लासिक 350 आणि मिटीओर 350 सारख्या बाईक्सच्या खरेदीदारांना झाला आहे.

Royal Enfield ने जाहीर केली नवीन Price लिस्ट; Meteor मॉडेल्ससह सर्व बाईकची नवीन किंमत, वाचा सविस्तर
Tesla Model Y: महागडी टेस्ला कार वादात, काचा फोडून मुलांना काढावे लागले बाहेर, आता १.७४ लाख गाड्यांची चौकशी होणार

हंटर 350 बेस रेट्रो व्हेरिएंटची किंमत आता फक्त 1.38 लाख रुपयांपासून सुरू होऊन टॉप-एंड गोवा क्लासिक मॉडेलची किंमत 2.20 लाख रुपये इतकी आहे. GST कपातीमुळे या बाईक्समध्ये 12,000 ते 19,000 रुपयांपर्यंतची घट झाली आहे. तथापि, 350cc पेक्षा जास्त क्षमतेच्या इंजिन असलेल्या बाईक्सच्या ग्राहकांना याउलट परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. कारण या श्रेणीतील सर्व बाईक्सवर आता 40% GST (31% वरून वाढवून) आकारण्यात येणार आहे, ज्यामुळे किंमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

Royal Enfield ने जाहीर केली नवीन Price लिस्ट; Meteor मॉडेल्ससह सर्व बाईकची नवीन किंमत, वाचा सविस्तर
GST Discount: दसऱ्याला घरी आणा कार; GST कपातीनंतर टाटाच्या या कारवर धमाकेदार डिस्काउंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

या वाढलेल्या दराचा परिणाम रॉयल एनफील्डच्या स्क्रॅम 440, ग्युरिल्ला 450, हिमालयन 450, इंटरसेप्टर 650, कॉन्टिनेंटल GT 650, शॉटगन 650, बेअर 650 आणि सुपर मिटीओर 650 सारख्या मॉडेल्सवर झाला आहे. यामध्ये Scram 440 साठी 15,000 रुपयांहून अधिक, Guerrilla 450 साठी 18,000 रुपयांपर्यंत, Himalayan 450 साठी जवळपास 21,000 रुपयांपर्यंत आणि Super Meteor 650 साठी तब्बल 29,000 रुपयांपर्यंत किंमत वाढ झाली आहे.

Royal Enfield ने जाहीर केली नवीन Price लिस्ट; Meteor मॉडेल्ससह सर्व बाईकची नवीन किंमत, वाचा सविस्तर
GST Reforms: GST कपातीचा Skoda कारवर परिणाम; महागड्या गाड्यांची किंमत घसरली, जाणून घ्या किंमत

एकूणच, GST 2.0 च्या सुधारणांचा परिणाम असा झाला आहे की 350cc पर्यंतच्या इंजिन क्षमतेच्या लोकप्रिय बाईक्स आता ग्राहकांसाठी अधिक परवडणाऱ्या ठरल्या आहेत, तर मोठ्या इंजिन क्षमतेच्या प्रीमियम मॉडेल्सच्या किंमती वाढल्यामुळे त्यांची खरेदी अधिक महागडी बनली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी हा निर्णय फायदेशीर झाला आहे, तर प्रीमियम सेगमेंटसाठी मात्र हा एक आव्हानात्मक बदल ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com