
GST 2.0 २२ सप्टेंबरपासून होणार लागू
जीएसटीमधील बदलामुळे थेट वाहनांच्या किंमती होणार कमी
रॉयल एन्फिल्ड २२००० रुपयांनी होणार स्वस्त
केंद्र सरकारने जीएसटीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जीएसटीमध्ये आता फक्त २ टॅक्स स्लॅब असणार आहे. यामुळे जीवनावश्यक गोष्टी ते वाहनांच्या किंमती कमी होणार आहे. जीएसटी टॅक्स स्लॅबमधील हा बदल सर्वसामान्यांसाठी फायद्याचा आहे. दरम्यान, जीएसटी टॅक्स स्लॅबची घोषणा करताना कार, बाईक त्यामधील पार्ट्स, सर्व्हिस, अॅक्सेसरीज याच्यादेखील किंमती केली जाणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे थेट कार आणि बाईकच्या किंमती कमी झाल्या आहेत.
रॉयल एन्फिल्ड 350cc ची किंमत कमी होणार
GST मधील या बदलामुळे 350cc च्या आतमधील बाईकच्या किंमती अजून कमी होणार आहेत. हे नवीन जीएसटी दर २२ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.दरम्यान, यामुळे रॉयल एन्फिल्ड 350cc च्या किंमतीतदेखील घट होणार आहे.
जीएसटीमुळे रॉयल एन्फिल्ड 350cc ची किंमत २२,००० रुपयांनी कमी होऊ शकते. तसेच क्लासिक 350 (Classic 350), बुलेट 350 (Bullet 350), हंटर 350 (Hunter 350), Meteor 350 याच्या किंमतीदेखील कमी होणार आहेत. त्यामुळे ज्यांना बाईक खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी ही उत्तम डील असणार आहे. याचसोबत 350cc पेक्षा जास्त असणाऱ्या बाईकच्या किंमतीतदेखील बदल करण्यात येणार आहे.
याबाबत रॉयल एन्फिल्डचे सीईओ बी गोविंदराजन यांनी सांगितले की, जीएसटीमधील बदलाचा 350cc पेक्षा कमीच्या किंमती कमी होणार आहेतच त्याचसोबत पहिल्यांचा बाईक खरेदी करणाऱ्यांना आकर्षिक करेल.
वाहनांवरील जीएसटी १८ टक्के
जीएसटी २.० मुळे ऑटोमोबाईल क्षेत्रावर परिणाम होणार आहे. लहान वाहने आणि टू व्हिलरवरील जीएसटी १८ टक्के करण्यात आला आहे. याआधी जीएसटी २८ किंवा त्यापेक्षा जास्त होता. त्यामुळे हे अनेक वाहन उत्पादक कंपन्यांसाठी फायदेशीर आहे. दरम्यान, रॉयल एन्फिल्ड घेण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता या बाईकच्या किंमतीत २२००० रुपयांनी कपात होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.