Shruti Vilas Kadam
रिंकूने 2016 मध्ये नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केले आणि एक उत्तम अभिनय सादर केला.
‘सैराट’मधील अभिनयासाठी तिला 63व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘Special Jury Award / Special Mention’ प्राप्त झाला.
महाराष्ट्र राज्य चित्रपट परिषदेत तिने ‘Best Child Artist’ म्हणून पुरस्कार जिंकला. तसेच, 2017 सालच्या Filmfare Awards Marathi मध्ये तिला ‘Best Female Debut’ आणि ‘Best Actress’ दोन्ही पुरस्कार मिळाले.
रिंकूने 12वी बोर्डमध्ये 82% गुण मिळवले, जे तिच्या अभिनयासोबत शालेय अभ्यासातही तिची समर्पितता दाखवते.
‘सैराट’चा कन्नड भाषेतील अनुवाद ‘मनसु मल्लिगे’ मध्ये तिने तिची भूमिका परत सादर केली.
2022 ला रिंकूने ‘झुंड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचबरोबर, ‘Hundred’ (2020) या डिजीटल वेब सिरीजमध्ये आणि ‘200 Halla Ho’ (2021) या ZEE5 सिरिजमध्येही ती दिसली
2023 मध्ये प्रदर्शित ‘झिम्मा 2’ या चित्रपटात रिंकूचा अभिनय स्तुत्य ठरला. हा मराठी चित्रपट त्या वर्षी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला