

Redmi Note 15 5G हा आतापर्यंतचा सर्वात स्लीम Note Series स्मार्टफोन
108MP प्रायमरी कॅमेरा आणि AI ड्युअल कॅमेरा सेटअप
5520mAh बॅटरीसह AMOLED डिस्प्ले
रेडमीने भारतीय बाजारात पु्न्हा एकदा एक शानदार फोन लॉन्च केलाय. आपल्या Note Series मधील नवा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलाय. नवीन Redmi Note 15 5G मध्ये मोठी बॅटरी, AMOLED डिस्प्ले आणि ड्युअल AI कॅमेरे यासारख्या फीचरचा समावेश आहे. Redmi Note 15 5G मध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेऱ्यासह HyperOS 2 देण्यात आले आहे. फोनमध्ये चार OS अपडेट्स आणि सहा वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सचे आश्वासन कंपनीने दिलंय.
Redmi Note 15 5G च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात ₹19,999 आहे, तर 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹21,999 आहे. ICICI, Axis आणि SBI क्रेडिट कार्डसह फोनवर 3000 रुपयांचा इस्टेंट कॅशबँक देण्यात येणार आहे. दरम्यान 9 जानेवारीपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ग्राहक हा फोन शून्य डाउन पेमेंट आणि 8 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट ईएमआयसह खरेदी करू शकतात. रेडमी नोट 15 मध्ये जिओकडून 16000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील.
ज्या लोकांना फोटोग्राफीची आवड आहे, त्यांच्यासाठी रेडमी नोट 15 5G स्मार्टफोन उत्तम पर्याय आहे. कारण या फोनमध्ये 108MP Samsung ISOCELL HM9 सेंसरचा कॅमेरा देण्यात आलाय. त्यात कॅमेऱ्यात AI फीचर्स सुद्धा देण्यात आलाय. हा फोन सर्व प्रकाश परिस्थितीत उच्च-रिझोल्यूशन फोटो कॅप्चर करू शकतो. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह, फोन 4K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतील.
कॅमेरा डायनॅमिक शॉट्स (लाइव्ह फोटो) ला देखील सपोर्ट करतो. या नव्या रेडमी नोटमध्ये 7.77 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेट आणि 3200 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले आय प्रोटेक्शन 2.0 साठी TUV ट्रिपल सर्टिफाइड आहे. हा वेट टच 2.0 ला देखील सपोर्ट करतो. स्क्रीनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.