RBI Action: महाराष्ट्रातील दोन बँकांवर आरबीआयची कारवाई, एकाचा परवानाच रद्द , ठेवीदारांचा जीव टांगणीला

Reserve Bank Of India Cancel Jijamata Mahila Bank License: जिजामाता बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. बँकेची कमाईची स्थिती समाधानकारक नसल्याने आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.
Reserve Bank Of India Cancel Jijamata Mahila Bank License
RBI cancels Jijamata Mahila Bank’s license and restricts Samarth Bank in Solapur; depositors worried about their savings.saam tv
Published On
Summary
  • आरबीआयनं समर्थ बँकेवर ६ महिन्यांसाठी कठोर निर्बंध लादले आहेत.

  • साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

  • दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

रिझर्व्ह बँकेने राज्यातील दोन बँकांवर कारवाई केली आहे. यातील एका बँकेचा थेट परवाना रद्द केलाय. त्यामुळे ठेवीदारांचा जीव टांगणीला लागलाय. सोलापूरच्या समर्थ बँकेवर निर्बंध घातलेत तर सातारा जिल्ह्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आलाय. दिवाळीच्या तोंडावर घेण्यात आल्याने ठेवीदारांचा जीव टांगणीला लागलाय

का करण्यात आली कारवाई?

बँकेकडे आवश्यक तेवढी भांडवली रक्कम नसणे. बँकेची कमाईची स्थिती समाधानकारक नसल्याने आरबीआयनं ही कारवाई केली आहे. या निर्णयामुळे जिजामाता बँकेच्या ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. तर सोलापुरच्या समर्थ सहकारी बँकेची आर्थिक शिस्त बिघडली होती. ठेवीदारांच्या हिताचं रक्षण केलं नाही. संचालक मंडळाला सुधारण्याची संधी देऊनही सुधारणा न केल्यानं आरबीआयनं ६ महिन्यांसाठी कठोर निर्बंध घातले आहेत.

Reserve Bank Of India Cancel Jijamata Mahila Bank License
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

दरम्यान आरबीआयने याआधी जिजामाता महिला सहकारी बँकेचा ३० जून २०१६ रोजी परवाना रद्द केला होता. परंतु बँकेने केलेल्या अपीलनंतर २३ ऑक्टोबर २०१९ रोजी परवाना पुन्हा बहाल करण्यात आला. अपिल प्राधिकरणाने तेव्हा निर्देश दिले होते की वित्तीय वर्ष २०१३-१४ साठी बँकेचा फॉरेन्सिक ऑडिट अहवाल तयार करण्यात यावा, त्यामुळे तिची खरी आर्थिक स्थिती समजेल.

Reserve Bank Of India Cancel Jijamata Mahila Bank License
Business idea: डाळ मिल नाहीतर आहे रोजगार अन् पैशाचा कारखाना; गावातच सुरू करा धमाकेदार बिझनेस

या ऑडिटसाठी आरबीआयने लेखापरीक्षक नेमले होते, मात्र बँकेने सहकार्य न केल्याने ऑडिट प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान, बँकेची आर्थिक परिस्थिती आणखी कमजोर होत गेली असं आरबीआयच्या मूल्यांकनातून दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला.

त्यामुळे बँक आता ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा परतफेड करू शकत नाही. दरम्यान या बँकेच्या लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू करून त्यासाठी लिक्विडेटर नेमण्यात यावे. ठेवीदारांचे संरक्षण आरबीआयच्या निवेदनानुसार परवाना रद्द झाल्यानंतर प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवींपैकी जास्तीत जास्त ५ लाख रुपये पर्यंतची रक्कम ठेव विमा.

पत हमी महामंडळ मार्फत मिळणार आहे, असं आरबीआयने महाराष्ट्रातील राज्य सहकार आयुक्तांना विनंती केली आहे. सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत एकूण ठेवींपैकी ९४.४१ टक्के ठेवी DICGC विमा संरक्षणाखाली होत्या, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com