Chindren UPI App: RBIचा मोठा निर्णय! आता लहान मुलांना वापरता येणार UPI; बँक अकाउंटची गरज नाही; कसं? वाचा

Childrens UPI Without Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुलांना कोणत्याही बँक अकाउंटशिवाय यूपीआय पेमेंट करता येणार आहे.
Chindren UPI App
Chindren UPI AppSaam Tv
Published On
Summary

लहान मुलांनाही करता येणार UPI चा वापर

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

UPI Circle अंतर्गत बँक खात्याशिवाय वापरता येणार यूपीआय

सध्या सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. आपण फक्त काही मिनिटांत जगातील कोणत्याही कोपऱ्यात पैसे पाठवू शकतो. पैसे पाठवण्यासाठी यूपीआय हे प्रभावी माध्यम आहे. दरम्यान, आतापर्यंत फक्त १८ वर्षांपेक्षा जास्त ज्यांचे बँक अकाउंट आहे त्यांनाच यूपीआयचा वापर करता येत होता. आता लहान मुलांनादेखील यूपीआयचा वापर करता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्युनियो पेमेंट्सला प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीआय) जारी करुन त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता लहान आणि किशोरवयीन मुलांना यूपीआय वापरण्याची परवानगी मिळेल

Chindren UPI App
Digital Payment Tips: दुसऱ्याच्या UPI खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले? मग परत तुमच्या खात्यात पैसा कसा येणार?

लवकरच डिजिटल वॉलेट होणार लाँच

आरबीआयच्या मंजुरीनंतर आता जुनियो पेमेंट्स यूपीआय लिंक्ड डिजिटल वॉलेट लाँच करण्याची तयाी करत आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुले आता बँक खात्याशिवाय यूपीआय वापरुन पेमेंट करु शकणार आहेत. वॉलेटचा वापर करुन ते क्यूआर कोड स्कॅन करुन पेमेंट करतील. इतर यूपीआयसारखेच त्यांनाही आता ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे. ही सुविधा यूपीआय सर्किल प्रोजेक्टशी सुसंगत आहे.

बँक खात्याशिवाय यूपीआय पेमेंट (UPI Payment Without Bank Account)

UPI Circle या उपक्रमाचा उद्देश मुलांना आणि किशोरवयीन मुलांना त्यांच्या पालकांशी जोडलेल्या यूपीआय खात्यांद्वारे पेमेंट करणे हा आहे. लहान मुलांना आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. आता लाखो लोक यूपीआयचा वापर करतात. अगदी लहानपासून ते मोठ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी यूपीआय वापरतात. आता लहान मुलांनाही याचा वापर करता येणार आहे.

Chindren UPI App
UPI Rule: सरकारचा मोठा निर्णय! UPI च्या नियमांत मोठा बदल, उद्यापासून होणार लागू

जुनियो कसं काम करणार?

जुनियो एक फिनटेक प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये मुलांना जबाबदारीने पैशांचा वापर कसा करायचा यासाठी मदत केली जाणार आहे. या अॅपवरुन मुलांचे आईवडिल पैसे ट्रान्सफर, खर्चाची मर्यादा यावर लक्ष ठेवू शकतात. यामध्ये तुमचा मुलगा काय करतो, त्यांच्या ट्रान्झॅक्शनवर लक्ष ठेवता येणार आहे.

Chindren UPI App
RBI नं विकलं 35 टन सोनं? 60 हजार कोटींचं काय केलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com