Ratan Tata: रतन टाटांचे २० सक्सेस मंत्र, ज्यात लपलंय यशाचं रहस्य

Ratan Tata Success Mantra: रतन टाटा हे भारतीय उद्योगसमूहातील खूप मोठे नाव आहे. रतन टाटा यांच्या यशाचा मंत्र जाणून घ्या.
Ratan Tata
Ratan TataSaam Tv
Published On

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. त्यांनी ८६ व्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांनी फक्त भारतात नव्हे कर संपूर्ण जगभरात टाटा समूहाचा विस्तार केला होता. त्यांनी १०० पेक्षा जास्त देशांमध्ये टाटा समूहाच्या कंपन्याचा विस्तार केला होता. त्यांनी अनेक कंपन्या उभारल्या. टाटा हे खूप श्रीमंत व्यक्ती होते. परंतु कधीही अब्जाधीशांच्या यादीत त्यांचे नाव आले नाही. कारण त्यांनी नेहमी आपली संपत्ती, पैसे हे देशहितासाठी किंवा चॅरिटेबल ट्रस्टला दान केले.

रतन नवल टाटा हे उद्योग विश्वातील खूप मोठे नाव आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्याना भारतात आणले. त्याचसोबत त्यांनी नेहमी सामाजासाठी अनेक गोष्टी केल्या.टाटांच्या यशाचा मंत्र अवलंबून प्रत्येकजण आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतो. रतन टाटांच्या यशाचे २० मंत्र.(Ratan Tata Success Mantra)

Ratan Tata
Government Scheme: मोदी सरकारचं देशातील नागरिकांना दसरा गिफ्ट; तब्बल चार वर्ष मिळणार मोफत धान्य

रतन टाटांच्या यशाचे मंत्र

१ लोखंड कोणीही नष्ट करु शकत नाही, परंतु त्यावरील गंज हा नक्की काढून टाकता येईल. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला कोणीही नष्ट करु शकत नाही. परंतु त्यांची मानसिकता दूर करु शकतात.

२. सत्ता आणि पैसे या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. माझे काम सर्वात महत्त्वाचे आहे.

३. जर तुम्हाला जलद चालायचे असेल तर एकटे जा. आणि तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर तुम्ही सर्वांसोबत जा.

४. जे लोक तुमच्यावर दगड फेकतात. त्याचं दगडांना उचलून त्यांच्यासाठी स्मारक बांधा

५.जे लोक आयुष्यात यशस्वी आहेत त्यांचे मी नेहमी कौतुक करतो परंतु जर त्यांनी क्रूरतेतून हे यश मिळवले असेल, तर त्यांचे मी फार कौतुक करत नाही.

६. जीवनातील चढ-उतार हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.कारण ईसीजीमधील सरळ रेष हीदेखील तुम्ही जिवंत नसल्याचे दाखवते. त्यामुळे नेहमी चढ उतार असावा.

७. आयुष्यात भौतिक गोष्टींचे महत्त्वाच्या नाहीत. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांवर प्रेम करा.

८. सर्वोत्कृष्ट नेता हा तोच असतो जो व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त हुशार सहाय्यक आणि सहकऱ्यांना सोबत घेऊन काम करतो.

९. मी वर्क लाइफ बॅलेंसवर विश्वास ठेवत नाही.याउलट मी वर्क लाइफ इंटिग्रेशन म्हणजे एकाकीरणावर विश्वास ठेवतो. तुमचे काम आणि जीवन अर्थपूर्ण आमि परिपूर्ण करा.

१०. आयुष्यात सर्वात मोठी जोखीम म्हणजे कोणतीही जोखीम न घेणे. जोखीम न घेणे हे तुमच्या अपयशाची कारणे असू शकतात. (Ratan Tata Success Story)

Ratan Tata
Ratan Tata Successor: रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ज्याच्या हातात असेल देशातील सर्वात प्रतिष्ठित समूहाची धुरा

११. आव्हानांचा सामना करताना दृढ आणि लवचीक व्हा.

१२. इतरांसोबत व्यव्हार करताना दयाळूपणा, सहानुभूती आणि करुणा ठेवा.

१३. तुमचे जीवन कधीच आरामदायी नसू शकते. तुम्ही जगातील सर्व समस्या सोडवू शकत नाही.परंतु कधीही स्वतः ला कमी लेखू नका. तुमच्यातील धैर्य खूप काही बदलू शकते.

१४.नेतृत्व ही एक जबाबदारी आहे.

१५. तुमच्याकडे संधी येण्याची वाट पाहू नका. स्वतः च संधी निर्माण करा.

१६.भारताच्या भविष्यातील प्रगतीबद्दल मला नेहमीच आत्मविश्वास वाटतो. भारत देश हा महान क्षमता असलेला देश आहे.

१७.लोक अजूनही मानतात की, जे ते वाचतात तेच खरं आहे. परंतु त्यापलीकडेही अनेक गोष्टी आहेत.

१८. मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही. पहिला निर्णय घेतो त्यानंतर त्याला योग्य बनवतो.

१९. महान व्यक्तींनी माझ्यासाठी मोठा वारसा सोडला आणि तो वारसा चालवण्याचा मी प्रयत्न केला.

२०. माझ्यावर कितीही टीका झाली तरीही टाटा मोटर्स आणि टाटा स्टीलमधील माझा हिस्सा मी कधीच विकणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com