Ratan Tata Named SUV Sumo: टाटा मोटर्सच्या SUV सुमोचा अर्थ माहितीये का? या मराठमोळ्या व्यक्तीचं मोठं योगदान

Tata Motors SUV Sumo Name :टाटाची एसयूवी सुमोच्या नावामागेही एक कारण आहे.
SUV Sumo
SUV SumoSaam Tv

Tata Motors SUV Sumo : वाहनांच्या उत्पादनात टाटा मोटर्सचे नाव अग्रेसर आहे. कोणतीही कार, ट्रक घेताना आजही लोक टाटा मोटर्सला प्राधान्य देतात. टाटा मोटर्सच्या अनेक कारच्या नावामागे अनेक कारणं आहेत. तसंच टाटाची एसयूवी सुमोच्या नावामागेही एक कारण आहे.

टाटा मोटर्सची आकाराने मोठी असलेली एसयूवी सुमो १९९४ मध्ये लाँच करण्यात आली होती. या कारने भारतातील मार्केटवर कब्जा केलेला असे म्हणायलाही हरकत नाही. १९९७ पर्यंत तब्बल एक लाखांहून अधिक कारची विक्री झाली होती. सध्या टाटा मोटर्स जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी आहे.

SUV Sumo
Gold Silver Price (19th August) : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण, चांदीही नरमली; जाणून घ्या आजचा दर

टाटा सुमो ही वेगवान आणि शक्तिशाली कार म्हणून ओळखली जाते. या कारचे नाव टाटा मोटर्सचे माजी एमडी सुमंत मूळगावकर यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.सुमंत मूळगावकर( SUMANT MOOLGAONKAR)मधील दोन अक्षर एकत्र करुन या कारचे 'सुमो' असे नाव ठेवण्यात आले आहे.

अनेकांच्या मनात टाटा सुमोच्या नावाबद्दव संभ्रम आहे. अनेकांच्या मते, शक्तिशाली किंवा मोठी अशा आशयाने ठेवण्यात आले होते. परंतु या कारचे नाव 'सुमो' ठेवण्यामागचे खरे कारण टाटा मोटर्सचे एमडी सुमंत मूळगावकर हे होते.

SUV Sumo
Petrol Diesel Price Today (19 Aug): कुठे स्वस्त तर कुठे महाग; तुमच्या शहरातील पेट्रोल आज कितीने घसरले?

कोण होते सुमंत मूळगांवकर?

सुमंत मूळगावकर यांचा जन्म ५ मार्च १९०६ रोजी मुंबईत झाला. टाटा मोटर्सच्या यशात सुमंत मूळगावकर यांचा मोठा वाटा आहे. टाटा पूर्वी लष्करी वाहने बनवत असे. नंतर सुमंत मुळगावकर यांनी टाटा मोटर्स कमर्शिल वाहने देखील बनवणार असा महत्त्वाचा निर्णय घेतला.त्यामुळे टाटा मोटर्सची प्रगती झाली आहे. मराठमोळ्या सुमंत मूळगावकर यांना अभिवादन म्हणून टाटाच्या या कारला 'सुमो' असे नाव देण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com