PPF Account: अल्पवयीन मुलांचं PPF खाते उघडताना 4 गोष्टी ठेवा डोक्यात, नाहीतर होईल नुकसान

Know 4 Points About PPF Account for Minor : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा दीर्घ मुदतीसाठी उत्तम पर्यायांपैकी एक आहे. ही योजना अल्पवयीन मुलांसाठीही चांगली मानली जाते. याचं सर्वात मोठे कारण म्हणजे ही एक कर बचत योजना आहे. परंतु अल्पवयीन मुलांच्या पीपीएफ खातं उघडत असताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
 PPF Account: अल्पवयीन मुलांचं PPF खाते उघडताना 4 गोष्टी ठेवा डोक्यात, नाहीतर होईल नुकसान
Know 4 Points About PPF Account for Minor
Published On

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. याचे कारण म्हणजे मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त राहते. हे खाते वृद्धांसह अल्पवयीन मुलांसाठी (18 वर्षाखालील) उघडले जाऊ शकते. हे खाते अल्पवयीन मुलांसाठी किमान 500 रुपयांमध्ये उघडता येते. यामध्ये तुम्ही वार्षिक जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. जर तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलांसाठी हे खाते उघडत असाल तर अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत.

सध्या त्यावर 7.1 टक्के दराने वार्षिक व्याज मिळत आहे. यामध्ये तुम्ही दरमहा 10 हजार रुपये जमा केल्यास 15 वर्षांत 18 लाख रुपये जमा होतील. 7.10 टक्के व्याजदराने 15 वर्षात सुमारे 13.56 लाख रुपये व्याज मिळेल. अशाप्रकारे 15 वर्षात तुम्ही एकूण 31.56 लाख रुपयांचा निधी मुलाच्या नावावर जमा कराल. हा निधी मुलाच्या उच्च शिक्षणासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी वापरला जाऊ शकतो. कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खाते उघडता येते. यासाठी मुलाच्या वयाशी संबंधित कोणतेही दस्तऐवज (जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड इ.) आवश्यक आहे.

मुलाचे खाते उघडताना या गोष्टी लक्षात ठेवा

पालक खाते सुरू ठेवा

पालक खाते उघडवू शकतात आणि ते स्वतः ते खाते ऑपरेट करू शकतील. मूलं 18 वर्षांचे झाल्यावर खाते चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली जाऊ शकते.

फक्त एकच पालक खाते उघडू शकता

फक्त एक पालकच मुलासाठी खाते उघडू आणि ऑपरेट करू शकतात. आई आणि वडील दोघेही मुलासाठी स्वतंत्र खाते उघडू शकत नाहीत.

करचा लाभ मिळणार नाही

अल्पवयीन मुलाच्या नावाने खाते उघडून 1.50-1.50 लाख रुपयांच्या करातून सूट मिळू शकत नाही. तुम्ही तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या दोन्ही खाते उघडून एकूण 1.50 लाख रुपयांची सूट मिळवू शकता.

तर मुलाचे खाते बंद केले जाणार नाही

जर एखाद्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि ते मुलाचे पीपीएफ खाते ऑपरेट करत असतील तर त्या मुलाचे खाते बंद केले जाणार नाही.

 PPF Account: अल्पवयीन मुलांचं PPF खाते उघडताना 4 गोष्टी ठेवा डोक्यात, नाहीतर होईल नुकसान
RBI Action: मोठी बातमी! आरबीआयची येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेवर कारवाई, काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com