खुशखबर! कोणत्याही गॅरंटीशिवाय व्यवसायासाठी सरकारची मदत, मिळणार ८०,००० रुपयांचं कर्ज; PM Svanidhi Yojana काय आहे?

PM Svanidhi Yojana For Street Vendors: केंद्र सरकारने व्यवसायासाठी आर्थिक मदत व्हावी, म्हणून पीएम स्वनिधी योजना सुरु केली आहे. या योजनेत रस्त्यावरील भाजीविक्रेते, फळविक्रेत्यांना पैसे दिले जातात.
PM Svanidhi Yojana
PM Svanidhi YojanaSaam Tv
Published On

केंद्राने तरुणांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. तरुणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात किंवा त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. या योजनांमधून आर्थिक मदत केली जाते. केंद्र सरकारने रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी खास योजना राबवली आहे. त्यांच्यासाठी खास पीएम स्वनिधी योजना राबवली आहे.

PM Svanidhi Yojana
eNAM Scheme: सब्सिडीत बळीराजाची नाही होणार फसवणूक; शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारचा मोठा निर्णय

पीएम स्वनिधी योजना आहे तरी काय? (PM Svanidhi Yojana)

पीएम स्वनिधी योजनेत सरकार ८०,००० रुपयांपर्यंतचे कर्ज देते. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही गॅरंटीशिवाय तुम्हाला हे लोन मिळते. या योजनेत स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी मदत केली जाते.

पीएम स्वनिधी योजना ही कोरोना काळत सुरु झाली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही गोष्ट तारण ठेवण्याची गरज नाही. या योजनेस सुरुवातीला १०,००० रुपये दिले जातात. त्यानंतर २०,००० रुपये अन् त्यानंतर ५०,००० रुपये दिले जातात.

PM Svanidhi Yojana
LIC Jeevan Shanti Scheme: मस्तच! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा; LIC जीवन शांती पॉलिसी आहे तरी काय?

पीएम स्वनिधी योजना ही भाजीविक्रेते, फळविक्रेते, रस्त्यावरील स्ट्रीट वेंडरसाठी सुरु करण्यात आली आहे. त्यांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे.

या योजनेत ३ हप्त्यांमध्ये पैसे दिले जाणार आहेत. यातील पहिला हप्ता घेतल्यानंतर तो १ वर्षाच्या आत परत करायचा आहे. जर तुम्ही पहिला हप्ता परत दिला तरच तुम्हाला तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार आहे. या योजनेसाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज मंजूर झाल्यावर तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात.

PM Svanidhi Yojana
NSC Scheme: वर्षाला ६० हजार गुंतवा, मॅच्युरिटीनंतर ४६.६७ लाख तुमचेच; सरकारची भन्नाट योजना एकदा पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com