
केंद्र सरकार नेहमीच नागरिकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. काही योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. तर काही योजनांमध्ये नागरिकांना त्यांच्या जीवनातील आवश्यक गोष्टींसाठी मदत केली जाते. केंद्र सरकारने पीएम सुर्य घर मोफत वीज योजना सुरु केली आहे. या योजनेत सरकार नागरिकांना सोलर रुफटॉप बसवण्यासाठी आर्थिक मदत करते. (PM Surya Ghar Yojana)
सोलर रुफटॉप बसवल्यावर वीज कमी लागते. सोलर पॅनलवर घरातील सर्व उपकरणे चालतात. त्यामुळे वीजेचं बील कमी येतं त्याचसोबत वीजदेखील कमी वापरली जाते. या योजनेत तुम्हाला ३०० युनिटपर्यंत फ्री वीज दिली जाते. याचसोबत ७८,००० रुपयांची सब्सिडीदेखील दिली जाते.
प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजना २०२४ मध्ये लाँच केली आहे. या योजनेत सरकार घराच्या छतावर सोलर रुफटॉप लावण्यासाठी सब्सिडी देते. या पैसे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात.
या योजनेत २ किलोवॅटपर्यंत सोलर पॅनल (Solar Panel) लावण्यासाठी ३०,००० रुपये दिले जातात. ३ किलोवॅट सोलर पॅनल लावण्यासाठी ४८००० रुपये दिले जातात. ३ किलोवॅटपेक्षा जास्त किलोवॅटचे सोलर पॅनल लावण्यासाठी ७८००० रुपयांची सब्सिडी दिली जाते. यामुळे घरावर सोलर पॅनलदेखील बसवले जाते.याचसोबत ते बसवण्यासाठी आर्थिक मदतदेखील मिळते.
अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही https://pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. याचशिवाय ऑफलाइन पद्धतीनेही रजिस्ट्रेशन करु शकतात. तुमच्या घराजवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.