PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खात्यात खटाखट जमा होणार ₹६००० रुपये

PM Kisan and Namo Shetkari Yojana Installment Come Together: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र येऊ शकतो. या महिन्यात शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam tv
Published On
Summary

पीएम किसानचा हप्ता फेब्रुवारीत येणार

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्र येण्याची शक्यता

शेतकऱ्यांना ६००० रुपये मिळणार

सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, त्यानंतर आता राज्य सरकारनेही शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना राबवली आह. या योजनेतदेखील ६००० रुपये दिले जातात. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण १२००० रुपये दिले जातात.आता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना ६००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: झेडपी निवडणुकीआधी शेतकऱ्यांना मिळणार ₹४०००; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता एकत्र येणार? (PM Kisan And Namo Shetkari Yojana Installment Come Together)

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वर्षभरात ३ हप्ते दिले जातात. दर चार महिन्यांनी पैसे जमा केले जातात. पीएम किसानचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात दिला होता. त्यानंतर पुढचा हप्ता फेब्रुवारीत देण्यात येईल. याचसोबत फेब्रुवारीत नमो शेतकरी योजनेचाही हप्ता जमा केला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते जमा केले जाणार आहेत.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: ठरलं! फेब्रुवारी महिन्यात येणार पीएम किसानचे ₹२०००; त्याआधी हे काम कराच

शेतकऱ्यांच्या खात्यात ₹६००० येणार? (Farmers Will Recieve 6000 Rupees)

नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता अजूनही दिलेला नाही. त्यामुळे या महिन्यात दोन हप्ते येऊ शकतात. नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये आणि पीएम किसानचे २००० रुपये दिले जाऊ शकतात. शेतकऱ्यांना एकूण ६००० रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हे पैसे कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? ₹२००० बाबत मोठी अपडेट

पीएम किसान योजनेसाठी केवायसी अनिवार्य (PM Kisan Yojana eKYC Mandatory)

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी अनिवार्य केले आहे. केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यात पीएम किसानचे ₹२००० रुपये दिले जाणार नाही. त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी हे काम करायचे आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अर्थसंकल्पानंतर खात्यात जमा होणार ₹२०००, समोर आली मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com