
पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट
या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हप्ता
शेतकऱ्यांना कधी मिळणार २००० रुपये
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ३ हप्ते दिले जातात. प्रत्येक हप्त्यात २००० रुपये दिले जातात. आतापर्यंत पीएम किसान योजनेत २० हप्ते देण्यात आले आहे. आता लवकरत २१ वा हप्ता दिला जाईल. पीएम किसान योजनेतील पुढच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.मात्र, ऑक्टोबर महिन्यात कदाचित हे पैसे दिले जाऊ शकतात. पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळणार नाहीये.
या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही (These Farmers Will Not Get PM Kisan Yojana Installment)
पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जर हप्ता हवा असेल तर त्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेत केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा हप्ता मिळणार आहे. तुम्हाला पीएम किसान योजनेची केवायसी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करु शकतात. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन कागदपत्रे अपलोड करायची आहे. आधार कार्डशी लिंक नंबरवर ओटीपी येईल त्यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.
याचसोबत तुमची सर्व माहितीदेखील योग्य आणि खरी असणे गरजेचे आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची खोटी माहिती दिली तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.याचसोबत एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळणार नाही. जर एकापेक्षा जास्त व्यक्तीने रजिस्ट्रेशन केले असेल तर त्यांच्यातील एकालाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
काही राज्यांमध्ये पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता देण्यात आला आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधी लाभ देण्यात आली आहे. त्यानंतर इतर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.