विमानाच्या खिडक्यांना छोटं छिद्रं का असतं? 99% लोकांना माहिती नसेल कारण

Surabhi Jayashree Jagdish

विमान प्रवास

जेव्हा आपण विमानात बसतो, तेव्हा खिडकीवर एक लहानसं छिद्र दिसतं. अनेक वेळा आपण त्याकडे लक्ष देतो पण त्याचं कारण समजत नाही. हे साधं दिसणारं छिद्र खरोखर खूप महत्वाचं असतं.

पण तुम्हाला माहीत आहे का त्याचं कारण?

आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की, त्या छोट्या छिद्राचं नेमकं काम काय असतं. हे फक्त डिझाईनचा भाग नसून त्यामागे वैज्ञानिक कारण आहे.

सुरक्षा

हे छोटं छिद्र विमानाची सुरक्षा, स्थिरता आणि प्रवाशांच्या सोयीशी थेट संबंधित असतं. या छिद्रामुळे विमानाची रचना सुरक्षित राहते.

35,000 फूट उंचीवर दबाव

विमान जेव्हा 35,000 फूट उंचीवर उडतं, तेव्हा बाहेरील हवेचा दबाव कमी असतो. त्यामुळे केबिनच्या आतला दाब नियंत्रित ठेवावा लागतो.

केबिनला सुरक्षित ठेवतं

या छिद्रामुळे केबिनचा दाब स्थिर राहतो. त्यामुळे प्रवासी सुरक्षित राहतात. यामुळे विमानाची कार्यक्षमता देखील टिकून राहते.

वायुदाबाचा समतोल

या लहान छिद्रामुळे केबिनच्या आत आणि बाहेरच्या हवेच्या दाबात संतुलन राहातं. दाबामध्ये अचानक बदल झाला तरी तो नियंत्रित राहतो. त्यामुळे संरचनेला ताण येत नाही.

तीन थर

हवाई जहाजाची खिडकी तीन वेगवेगळ्या थरांनी बनलेली असते. या थरांमुळे खिडकी मजबूत राहते. लहान छिद्र मधल्या थरामध्ये असतं.

अचानक दाबाचा धक्का बसत नाही

या छिद्रामुळे दाब हळूहळू समतोल होतो आणि अचानक धक्का बसत नाही. त्यामुळे खिडकी तडकण्याची किंवा फुटण्याची शक्यता खूपच कमी होते.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

Sindhudurg Tourism | saam tv
येथे क्लिक करा