भारत सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना राबवण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने या योजना राबवण्यात येतात. त्यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना.
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतात. २०१८ साली ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. वर्षातून तीन वेळा प्रत्येकी २-२ हजार रुपये दिले जातात. या योजनेत तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. तर आता या योजनेचा १८ वा हप्ता देण्यात येणार आहे. (PM Kisan Sanman Nidhi Yojana)
पीएम किसान सन्मान निधी योजनेत वार्षिक ६००० रुपये दिले जातात. प्रत्येक चार महिन्यांनी हा हप्ता दिला जातो. हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांना देण्याची शक्यता आहे.
जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा स्टेट्स चेक करायचा असेल तर अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. pmkisan.gov.in या वेबसाइटवर याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.(PM Kisan Sanman Nidhi Yojana Status)
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा स्टेट्स कसा तपासायचा?
सर्वप्रथम तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर होमपेजवर Know Your Status असा ऑप्शन दिसेल.
त्यानंतर तुम्हाला नवीन विंडो ओपन झालेली दिसेल.
यामध्ये तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर द्यावा लागेल.
यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यावर तुम्हाला या योजनेचा स्टेट्स दिसेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.