Government Scheme: शेतकऱ्यांना पेन्शन, दर महिन्याला मिळतात ३००० रुपये; कसे ते जाणून घ्या!

PM Kisan Mandhan Yojana: देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत मिळवून देण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला काही आर्थिक मदत मिळते. त्यातीलच एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना.
Government Scheme For Farmer
Government Scheme For FarmerSaam Tv
Published On

PM Kisan Mandhan Yojana Farmers Get 3 Thousand Rupees Per Month:

देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत मिळवून देण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला काही आर्थिक मदत मिळते. त्यातीलच एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना.

पीएम किसान मानधान योजने ही अल्प आणि अत्यलप भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ६० वर्षांनंतर घरी असलेल्या शेतकऱ्यांना दर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेअंतर्गत जर कोणत्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला पेन्शनची ५० टक्के रक्कम मिळते. (Latest News)

ही पेन्शन फक्त पती आणि पत्नीसाठीच लागू आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे मुलांना मिळत नाहीत. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील शेतकरी सहभागी होऊ शकतात.

पीएम किसान मानधन योजना

पीएम किसान मानधन योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मासिक पेन्शन देते. यामध्ये वयाची ६० वर्ष ओलांडल्यानंतर तुम्हाला दरमहिना ३ हजार रुपये मिळेल. एका वर्षात तुम्हाला ३६ हजार रुपये मिळतील. या योजनेत शेतकऱ्याच्या वयानुसार पैसे जमा करावे लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान ५५ ते २०० रुपये जमा करावे लागतील. हे पैसे शेतकऱ्याच्या वयाच्या आधारावर जमा करावे लागतात. जर एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ५० टक्के म्हणजेच महिन्याला १५०० रुपये मिळतील. आतापर्यंत या योजनेत तब्बल १९.४७,५८८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. याबाबत मनी कंट्रोलने अहवाल दिला आहे.

Government Scheme For Farmer
Gold Silver Rate (18th January 2024): सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या आजचा भाव

तुम्हालाही जर पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यासाठी अर्ज करावा लागेल. ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमी आहे. तेच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे.

Government Scheme For Farmer
MRF Company Share: MRF कंपनीच्या शेअरची किंमत 1.50 लाखांवर; एमआरएफचा शेअर एवढा महाग का? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com