देशातील सर्वात महाग स्टॉक MRFने बुधवारी ट्रेडिंग दरम्यान 10 टक्क्यांनी वाढ नोंदवून 1.50 लाख रुपयांचा टप्पा गाठला आहे. पहिल्यांदाच देशातील कोणत्याही शेअरची किंमत दीड लाखांपर्यंत पोहोचली आहे. मात्र नंतर शेअर 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह 134969.45 रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षी जूनमध्ये एमआरएफ कंपनीच्या शेअरची किंमत 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी देखील हा टप्पा गाठणारा हा देशातील पहिला स्टॉक होता. MRF ही देशातील सर्वात मोठी टायर उत्पादक कंपनी आहे आणि जगातील टॉप 20 टायर कंपन्यांमध्ये तिचा समावेश होतो. (share market latest news)
एमआरएफ कंपनी बाईकपासून ते फायटर प्लेनपर्यंत सर्वांसाठी टायर बनवते. आज जरी ती टायर बनवणारी कंपनी म्हणून ओळखली जात असली तरी एकेकाळी ती लहान मुलांसाठी फुगे बनवायची. या कंपनीचं पूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी आहे. आज या कंपनीचे मार्केट कॅप 57,242.47 कोटी रुपये आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एमआरएफ शेअरची टप्प्याटप्प्याने वाढ
एमआरएफ शेअरची किंमत एका महिन्यात सुमारे 13 टक्क्यांनी वाढली आहे. एमआरएफच्या शेअरची किंमत 6 महिन्यांत 32 टक्क्यांनी वाढली आहे, तर एका वर्षात 50 टक्क्यांनी वाढली आहे. एमआरएफचा शेअर 5 वर्षांत 105 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 2016 मध्ये या शेअरने पहिल्यांदा 50 हजार रुपयांची किंमत गाठली होती.
एमआरएफचा शेअर बाजारात आला तेव्हा त्याची किंमत सुमारे 1100 रुपये होती. परंतु आता ती आता दीड लाखांपर्यंत पोहोचली आहे. कंपनीचे शेअर्स कधीही प्लिट (विभाजन) केले गेले नाहीत. शेअर स्प्लिट करणे म्हणजे कंपनीचा एक शेअर 100 रुपये असेल आणि कंपनीने 1:1 मध्ये विभाजित केले तर तुमच्याकडे कंपनीचे दोन शेअर असतील. परंतु आता एका शेअरची किंमत फक्त 50 रुपये राहील. म्हणजे कंपनीत तुमची गुंतवणूक वाढली किंवा कमी झाली नाही तर शेअर्सची संख्या वाढली आणि किंमत कमी झाली. एमआरएफने आपले शेअर कधीच स्प्लिट केले नाहीत. कंपनीला फक्त दीर्घकालीन गुंतवणूकदारांनीच त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करावी असं वाटतं.
देशातील महाग शेअर
MRF कंपनीच्या शेअर एवढे महाग कोणत्याच कंपनीचे शेअर नाहीत. सध्या भारतात दुसरा सर्वात महाग शेअर पेज इंडस्ट्रीजचा (Page Industries Ltd) आहे. ज्याची किंमत 37,739 रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावर हनीवेल ऑटोमेशन इंडिया (Honeywell Automation India Ltd) आहे. ज्याची किंमत प्रति शेअर 37,279 रुपये आहे. चौथ्या क्रमांकावर 3M इंडिया (3M India Ltd) आहे. ज्याच्या शेअरची किंमत सध्या 34,370 रुपये आहे. पाचव्या क्रमांकावर श्री सिमेंट (Shree Cement Ltd) आहे, त्यातील एक शेअर सध्या 26,070 रुपये आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.