शेअर मार्केटमध्ये बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स १६०० अंकानी घसरला. तर निफ्टी ४६० अंकानी घसरल्याचे दिसून आले. तर आज बँक निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. याचदरम्यान, आज एका शेअरने इतिहास रचला आहे. आज अचानक या शेअरची प्रति शेअर किंमत ही दीड लाख पार गेली. (Latest Marathi News)
मीडिया रिपोर्टनुसार, शेअर मार्केटमधील महागडा स्टॉक MRF ने आज बुधवारी इतिहास रचला आहे. या कंपनीचा शेअर इंट्राडेदरम्यान १३५२०.७ रुपयांपर्यंत पोहोचला. तर आज या शेअरची किंमत दीड लाखापर्यंत पोहोचली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हा शेअर आतापर्यंत सर्वात मोठी पातळीवर पोहोचला. मंगळवारी या स्टॉकचा प्रति शेअर १३६४७९.३० रुपयांवर बंद झाला होता. तर कंपनीचा मार्केट कॅप ५७ हजार कोटी रुपये झाला आहे.
एमआरएफचा शेअर हाय प्राइजवर पोहोचल्यानंतर घसरण पाहायला मिळाली. बुधवारी सकाळी या शेअरची किंमत १,३६,२२९ रुपये होती. आज शेअरमार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर आज अचानक एमआरएफच्या शेअरची किंमत 1,50,254.16 पोहोचली होती. त्यानंतर या शेअरची किंमत १,३४,६००.०५ इतक्या रुपयांवर बंद झाली.
HdFC बँकेचा शेअर बुधवारी १,५३९ रुपये प्रति शेअरवर बंद झाला. आज दिवसभरात बँक निफ्टी २००० अंकानी घसरला. तर आज सेन्सेक्स १६०० अंकानी घसरला.तर निफ्टी ४६० अंकानी घसरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.