आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत दररोज कच्च्या तेलाच्या किंमती बदलत असतात. यामुळे देशांतर्गत बाजारातही तेलाच्या किंमतींमध्ये बरेच बदल दिसून येतात. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी (28 जानेवारी 2024) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.
देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ किंवा घटही झालेली दिसत नाही. या संदर्भात आज देशातील महाराष्ट्र राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती ते जाणून घ्या.
देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तसेच सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता देशांतर्गत बाजारासाठी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर करतात. यामुळेच पेट्रोल आणि डिझेलबाबतचे ताजे अपडेट्स रोज जाहिर होतात.
देशातील 4 प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या दराची स्तिथी पाहा -
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर इतका आहे.
कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात 1 लीटर पेट्रोलची किंमती ही 107.08 रुपये इतकी आहे, तर डिझेल चे 1 लीटरसाठीचे दर 94.27 रुपये एवढे आहे. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव किती?
पुणे
पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.71 रुपये प्रति लिटर
ठाणे
पेट्रोल रुपये 106.40 आणि डिझेल 92.87 रुपये प्रति लिटर
नाशिक
पेट्रोल 105.88 रुपये आणि डिझेल 92.41 रुपये प्रति लिटर
नागपूर
पेट्रोल 106.08 रुपये आणि डिझेल 92.63 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर
पेट्रोल 106.75 रुपये आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.