Petrol Diesel Prices On July 14: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ; मात्र 'या' शहरामध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

Petrol Diesel Prices Hike: ब्रेंड क्रूड ऑइलच्या किंमतीत ०.२६ टक्क्यांनी वाढ होऊन प्रति बॅरल ८१.५७ डॉलरने विकले जात आहे.
Petrol Diesel Price
Petrol Diesel PriceSaamTV
Published On

Petrol Price In Maharashtra Today: शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झालेली दिसत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल आणि ब्रेंट क्रूड ऑइल दोन्हींच्या किंमती वाढल्यात. अशात WTI ०.४७ टक्क्यांनी वाढले असून प्रति बॅरल ७७.२५ डॉलरवर पोहचले आहे. तर ब्रेंड क्रूड ऑइलच्या किंमतीत ०.२६ टक्क्यांनी वाढ होऊन प्रति बॅरल ८१.५७ डॉलरवर पोहचले आहे. (Todays Petrol Diesel Prices)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्या तरी शुक्रवारी काही शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोल २१ पैशांनी स्वस्त झाले असून ९६.४२ रुपयांने विकले जात आहे तर डिझेल २१ पैशांनी स्वस्त झाले असून ९२.१७ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

Petrol Diesel Price
Sara Tendulkar कुठला Business करते माहितेय का?

प्रयागराजमध्ये पेट्रोल डिझेल ३१ पैशांनी स्वस्त झालेय. आज पेट्रोलची किंमत ९७.३३ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५१ रुपये प्रति लिटरवर पोहचली आहे. अमृतसरमध्ये पेट्रोल ९८.७४ प्रति लिटर आणि डिझेल ८९.०४ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. येथे ९ पैशांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं आहे.

मुंबईतील दर काय आहेत?

मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. अन्य चारही प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झालेला नाही.

Petrol Diesel Price
Tea Business : तुमच्या ऑफिस बाहेरचा चहावाला अंदाजे किती पैसे कमवत आहे? वाचा सविस्तर

नवी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल ११ पैशांनी महागले आहे. त्यामुळे पेट्रोल १०२.७४ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com