Credit Card: टार्गेटच्या चक्करमध्ये धडाधड वाटले क्रेडिट कार्ड;खाऊन पिऊन लोकांनी बँकेला लावला चूना

Credit Card Default Rise: क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. क्रेडिट कार्ड डिफॉल्ट आणि थकबाकी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
Credit Card
Credit CardGoogle
Published On

Latest Banking News Updates in Marathi: सध्या अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्डचा वापर करुन लोकांना कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर लगेच पैसे द्यावे लागत नाही. क्रेडिट कार्डधारकांनी जर कार्डवरुन पेमेंट केले तर त्यांना काही कालावधीनंतर हे पैसे द्यावे लागतात.परंतु क्रेडिट कार्डमुळे बँकाचे नुकसान होताना दिसत आहे.

क्रेडिट कार्डधारक नेहमी क्रेडिट कार्डचा वापर करतात. परंतु व्याजदर जास्त असल्याने ग्राहक हे पैसे भरु शकत नाहीत. त्यामुळे बँकेकडे खूप जास्त प्रमाणात थकबाकी आहे.

Credit Card
PPF Scheme: कामाची बातमी! दररोज फक्त २०४ रुपये गुंतवा अन् करोडपती व्हा

सध्या क्रेडिट कार्डची थकबाकी आणि डिफॉल्ट सतत वाढत आहेत. TransUnioun CIBIL च्या ताज्या आकडेवारीनुसार, क्रेडिट कार्ड डिफॉल्ट जून २२४ पर्यंत १.८ टक्क्यांवर पोहचले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये क्रेडिट कार्ड डिफॉल्ट १.७ टक्के होते. या यादीत नेहमी वाढ होताना दिसत आहे. या लिस्टमध्ये किरकोळ वाढ होत असली तरी क्रेडिट कार्डच्या थकबाकी २.७ लाख कोटी रुपये झाली आहे. मार्च २०२४ पर्यंत थकबाकी २.६ लाख कोटी रुपये होती. २०१९ मध्ये कोविड महामारीपूर्वी एकूण क्रेडिट कार्ड थकबाकी ८७,६८६ कोटी रुपये होती.गेल्या पाच वर्षात २४ टक्के थकबाकी वाढली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, निव्वळ कर्जाचे नुकसान म्हणजे क्रेडिट कार्डमधील तोटा हा ५-६ टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या तीन महिन्याल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड्सचा तोटा ७.५ टक्के होता. याबाबत डेट रिलीफ प्लॅटफॉर्म फ्रीडचे सीईओ रितेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, कर्जदार क्रेडिट कार्डची रक्कम हप्त्यांमध्ये परतफेड करतात. परंतु उच्च व्याजदरांमुळे कर्जदार पैसे परतफेड करु शकत नाही. यामुळ बँकेकडे थकबाकी जास्त वाढताना दिसत आहे.

Credit Card
5 Central Government Schemes: केंद्र सरकारच्या या 5 योजना सामन्यांसाठी आहे खास, तुम्हीही घेऊ शकता लाभ

एका खाजगी बँकेच्या अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, EMI पर्याय रोल ओव्हर दरापेक्षा कमी दराने क्रेडिट ऑफर करतो. अनेक क्रेडिट कार्डांवर डिफॉल्ट होत आहेत. असुरक्षित कर्ज क्षेत्रात तणाव वाढत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उपाययोजनामुळे असुरक्षित कर्ज क्षेत्राची वाढ कमी झाली आहे.

Credit Card
Government Scheme: खुशखबर! महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला मिळणार इतके पैसे; नोव्हेंबरपर्यंत करु शकतात अर्ज; जाणून घ्या डिटेल्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com