Personal Loanघेताना चुकूनही करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान

Personal Loan: बरेचजण त्यांच्या गरजांसाठी वैयक्तिक कर्ज घेतात. काही लोक त्यांच्या चुकांमुळे कर्जाच्या तावडीत अडकतात. वैयक्तिक कर्जाशी संबंधित काही चुका केल्या तर तुम्ही दिवाळखोर होत असतात.
Personal Loan
Personal Loanyandex

Mistakes people make related to personal loan: या महागाईच्या काळात पगारातून दैनंदिन जीवनाचा खर्च चालवणं मोठ्या जिकरीचं काम असतं. सामान्य पगार असलेले व्यक्तींना मोठ्या खर्चामुळे आर्थिक चणचण जाणवत असते. त्यांच्याकडे पैशांची सेव्हिंग नसते, अशात काही जर काही लग्न समारंभ, कोणती संकट आलं तर त्यावेळी त्यांच्याकडे पैसा नसतो. अशावेळी बहुतेक जण वैयक्तिक कर्ज घेतात.

वैयक्तिक कर्ज घेऊन ते आर्थिक संकटातून तात्पुरत्या स्वरुपात सुटका मिळवतात. परंतु कर्ज नावांचं भूत कर्जाची परतफेड होऊपर्यंत त्यांच्या मनगुटीवर बसलेलं असतं. आर्थिक अडचण इतकी मोठी असते की, त्यातून कसं मुक्त होता येईल हे पाहत असतो. यात कर्जावर ईएमआय कसा असेल. कर्ज कशा स्वरुपात आहे, अशा गोष्टींकडे लक्ष न देता आपण वैयक्तिक कर्ज घेत असतो. अशा एक नाही ७ मोठ्या गोष्टी आहेत ज्याकडे आपण लक्ष देत नाहीत. याकडे दुर्लक्ष करणं आपल्याला दिवाळखोर बनवण्यास कारणीभूत ठरत असतं.

कर्जाच्या अटी व शर्ती आधी तपासा (Ignoring fees and charges)

प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी कर्जाच्या प्रीपेमेंट अटी तपासल्या पाहिजेत. अनेक बँका यावर दंड आकारतात, म्हणजेच कर्जाची मुदत पूर्ण होण्यापूर्वी कर्जाची परतफेड केल्यास दंड भरावा लागतो.

उत्पन्नानुसार कर्ज घ्या (Borrowing more than you need)

कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक कर्ज देण्यापूर्वी बँका अनेक गोष्टी तपासतात. यात कर्ज घेणारी व्यक्ती कर्ज वेळेवर परत करू शकेल की नाही? यासाठी वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय, उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअर यासारख्या अनेक तपशीलांचा विचार बँक करत असते. दरम्यान वैयक्तिक कर्ज पगारानुसार मिळते. त्यामुळे आपण आपले उत्पन्न किती आहे, हे पाहावं त्यानुसार वैयक्तिक कर्ज घ्यावे. नाहीत अनेकजण उत्पन्न कमी असूनही मोठं कर्ज घेत असतात.

सिबिल स्कोअर ठेवा चांगला (Disregarding credit score)

वैयक्तिक कर्ज देण्यापूर्वी कोणतीही बँक निश्चितपणे CIBIL स्कोअर तपासते. यामुळे ती व्यक्ती किती सहजपणे कर्ज फेडणार की नाही हे बँकेला कळतं. बँका साधारणत ७५० वरील CIBIL स्कोअरलाच प्राधान्य देतात. पर्सनल लोन घेतल्यानंतर दर महिन्याला हप्ता भरावा लागतो.

ईएमआय जाणून घ्या EMI

कर्ज घेतल्यानंतर बँक आपल्याला ईएमाय लावून देत असते. या ईएमाय म्हणजेच हप्ता यात वैयक्तिक कर्जाची मूळ रक्कम आणि व्याजदरचा समावेश असतो. जो हप्त्यांमध्ये म्हणजेच EMI मध्ये भरावा लागतो. कर्ज घेण्यापूर्वी दरमहा किती EMI भरावा लागेल? हे तपासले पाहिजे. वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना प्रथम व्याजदर तपासा. कोणती बँक कोणत्या व्याजदराने कर्ज देत आहे? कमी व्याजदर देणाऱ्या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणे फायदेशीर ठरू शकते का या सर्व गोष्टींचा विचार करा आणि कर्ज घ्या.

वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी, तुम्हाला बँक किंवा NBFC बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तिची सेवा, तिची योजना आणि बँकेची सेवा कशी आहे. या गोष्टी जाणून घेतल्यानंतर अनेक फायदे होतात. तर काही समस्या टळू शकतात. वैयक्तिक कर्ज घेताना काही बँका ईएमआय आणि फ्लेक्सिबल ईएमआयचा पर्याय देतात. मानक EMI मध्ये हप्ता मासिक असतो, तर फ्लेक्सिबल EMI मध्ये कमी हप्ता हळूहळू वाढविला जातो. ते हप्ते आरबीआयच्या धोरणानुसार कमी जास्त होत असतात. मानक हप्ता म्हणजे सोप्या भाषेत जाणून घ्यायचं असेल निश्चित ठरवण्यात आलेले व्याज. म्हणजेच महिन्याला ठराविक रक्कम तुम्हाला जमा करावी लागते.

Personal Loan
EPFO New Rule: EPFO चा नवीन नियम! आता काढू शकणार १ लाख रुपये; २७ कोटींहून अधिक खातेधारकांना फायदा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com