Gautam Adani : भ्रष्टाचाराच्या आरोपांचे अदानींकडून खंडन; अमेरिकेतील न्यायालयातील आरोपपत्राचा अदानी ग्रुपकडून दाखला

Gautam Adani News : गौतम अदानींवर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नाहीत, असे अदानी ग्रुपकडून स्पष्टीकरण देण्यात आलेय. अदानी यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचे आरोप करण्यात आल्याच्या बातम्यांनी देशात खळबळ उडाली होती.
Adani Group
Adani GroupSaam Tv
Published On

गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर अमेरिकेच्या न्याय विभागाच्या (DoJ) आरोपत्रानुसार, भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नाहीत, असे स्पष्टीकरण अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीकडून देण्यात आलेय. अमेरिकेत अदानी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याच्या बातम्यानंतर भारतीय उद्योग व्यवसायात खळबळ उडाली होती. त्यावर आता अदानी ग्रुपकडून स्पष्टीकरण देण्यात आलेय. गौतम अदानी आणि त्यांच्या पुतण्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नाहीत. अदानी यांचा पुतण्या सागर अदानी अमेरिकेच्या न्याय विभागाच्या (DoJ) आरोपत्रानुसार भ्रष्टाचाराच्या आरोपांतून मुक्त करण्यात आल्याचा दावा अदानी ग्रुपकडून कऱण्यात आले. अदानी ग्रुपकडून स्पष्टीकरण दिल्यानंतर शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांनी नेमकं काय म्हटलेय?

गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर ‘युएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस कायद्याचे’ (FCPA) उल्लंघन केल्याचे कोणतेही आरोप नाहीत. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DoJ) ‘युएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस कायद्याच्या’ आरोपांतून त्यांना वगळले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या (DoJ) आरोपपत्रानुसार, फक्त Azure आणि CDPQ अधिकाऱ्यांवर लाचखोरीचे आरोप ठेवण्यात आले आहेत.अदानी समुहाशी संबंधित अधिकाऱ्यांवर लाचखोरी किंवा भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे सर्व ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त ‘चुकीचे’ आहेत.

Adani Group
PM Modi : पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आला फोन

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने (AGEL) स्टॉक एक्सचेंजेसमध्ये दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, गौतम अदानी व त्यांचा पुतण्या सागर अदानी, वरिष्ठ अधिकारी विनित जैन यांना अमेरिकेच्या न्याय विभागाच्या (DoJ) आरोपत्रानुसार भ्रष्टाचाराच्या आरोपांतून मुक्त करण्यात आले आहे. माध्यमांमधून अदानीच्या अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचे केलेले वृत्तांकन ‘चुकीचे’ आहे.

प्रसारमाध्यमात काय दावा केला ?

अदानी यांच्यावर अमेरिकेत भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर ‘युएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस कायद्याचे’ (FCPA) उल्लंघन केल्याचे आरोप ठेवले गेले आहेत. अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत अटक वॉरंट जारी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. प्रसारमाध्यमांच्या बातम्या खोट्या असल्याचे अदानी ग्रुपकडून सांगण्यात आलेय.

अदानी ग्रुपकडून काय स्पष्टीकरण ?

अदानी यांच्यावर अमेरिकेच्या न्याय विभागाच्या (US DoJ) आरोपपत्र किंवा अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या (US SEC) नागरी तक्रारीमध्ये एफसीपीएच्या (FCPA) कोणत्याही उल्लंघनाचे आरोप ठेवले गेलेले नाहीत.

या कायदेशीर आरोपपत्रामध्ये ‘काउंट’ हा शब्द म्हणजे एखाद्या प्रतिवादीविरुद्ध असलेल्या वैयक्तिक आरोपांना उद्देशून वापरला जातो. DoJ च्या आरोपपत्रामध्ये पाच काउंट्स आहेत आणि काउंट वन म्हणजेच पहिला आरोप ‘FCPA चे उल्लंघन करण्याचा कट’ असा आहे. यामध्ये त्यांच्या नावाचा कोणताही उल्लेख नाही किंवा त्यांना यातून वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, पाचव्या आरोपात ‘न्याय प्रक्रिया अडवण्याचा कट’ (पृष्ठ ४१) मध्ये देखील नावांचे उल्लेख नाहीत.

आरोपपत्राच्या काउंट वनमध्ये ज्यात भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे आरोप आहेत; तिथे फक्त Azure Power आणि CDPQ ही कॅनेडियन गुंतवणूकदार कंपनी आहे. त्यांच्या रंजीत गुप्ता, सिरिल कॅबानेस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रूपेश अग्रवाल यांचा त्यात समावेश आहे. या काउंट अंतर्गत अदानी समुहाशी संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव DoJ ने घेतलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com