
भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांसाठी देशात अनेक योजना राबवण्यात येतात. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा योजना राबवली आहे.मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत वीज मिळते. (Mukhyamatri Baliraja Yojana)
मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत विजबिलाचा भार कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यात ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपंपाना मोफत वीज पुरवली जाणार आहे.या योजनेत १४ हजार ७६१ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही ५ वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. एप्रिल २०२४ ते २०२९ पर्यंत ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा दर तीन वर्षांनी आढावा घेतला जाईल. या योजनेअंतर्गत ७.५ एच पी पर्यंत शेतीपंपाला मोफत वीज पुरवली जाणार आहे. (Mukhyamantri Baliraja Yojana For Farmer)
एप्रिल २०२४ पासून ७.५ एच पी पर्यंतचा शेती पंप असलेल्या शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे. या वीजेच्या बिलाची रक्कम शासनाकडून वीज बिल कंपनीला दिली जाणार आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी इतर योजना
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षी ६ हजार रुपये दिले जातात. केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेसारखीच ही योजना आहे. त्यामुळे पीएम किसानचे ६००० रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.