Muhurut Trading 2025 : शुभ मुहूर्तावर सेन्सेक्स-निफ्टीची सौम्य तेजी; कोणते शेअर्स चमकले?

Muhurut Trading 2025 Update : शुभ मुहूर्तावर सेन्सेक्स-निफ्टीची सौम्य तेजी पाहायला मिळाली. आजच्या शुभ मुहूर्तावर कोणत्या कंपनीला मोठा फायदा झाला, जाणून घ्या.
Muhurut Trading
Muhurut Trading 2025Saam tv
Published On
Summary

मुहूर्त ट्रेडिंग 2025 मध्ये बाजारात किरकोळ तेजी

सेन्सेक्स 62.97 अंकांनी वाढून 84,426.34 वर बंद झाला

निफ्टी 25.45 अंकांनी वाढून 25,868.60 अंकांवर बंद झाला

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात सौम्य सकारात्मकतेची भावना

Muhurat Trading : भारतीय शेअर बाजारत या वर्षीचं मुहूर्त ट्रेडिंग सेशन समाप्त झालं. या वर्षीच्या शुभ मुहूर्तावरील शेअर बाजारातलं सेशन किरकोळ तेजीसह बंद झालं. या सेशनमध्ये बाजाराची घसरण सुरूवातीला थांबवता आली नाही. या सेशनमध्ये बीएसई सेंन्सेक्स ६२.९७ अंकांनी वाढून ८४,४२६.३४ अंकावर पोहोचला. तर एनएसईचा निफ्टी ५० इंडेक्स २५.४५ अंकानी वाढून २५,८६८.६० अंकावर बंद झाला.

बाजारात मुहूर्त ट्रेडिंगमध्ये थोडीशी तेजी पाहायला मिळाली. आज मंगळवारी सेन्सेक्सच्या ३० पैकी २८ कंपन्यांचे शेअरमध्ये वाढ पाहायला मिळाली. तर २ कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना फटक बसला. निफ्टीच्या ५० पैकी ४९ कंपन्यांना फायदा झाला. त्यांच्या शेअरने वाढीसह व्यवहाराला सुरुवात केली. तर निफ्टीच्या एका कंपनीमध्ये घसरण पाहायला मिळाली.

Muhurut Trading
Govardhan Asrani Dies: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचा जगाला अलविदा, मृत्यूपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल

मुहूर्त ट्रेडिंगच्या सेशनमध्ये गुंतवणूकदार आयटी, बँकिग आणि ऑटोच्या शेअरवर गुंतवणूकदारांनी अधिक गुंतवणूक केली. या सेशनदरम्यान रिलायन्स इंडंस्ट्रीज, आयसीआयसी बँक आणि टीसीएस बँकेत मोठी तेजी पाहायला मिळाली. यावेळी सर्व क्षेत्रातील इंडेक्समध्ये किरकोळी तेजी पाहायला मिळाली. दिवाळीतील मुहूर्त ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स-निफ्टीचे शेअर तेजीसह बंद झाले.

Muhurut Trading
Shaniwar Wada Namaz Row : खासदार मेधाताई तुमच्या बापाचा शनिवारवाडा नाही; राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे कडाडल्या

शेअर बाजारात आज दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सेशन दुपारी १.४५ ते २.४५ पर्यंत सुरु होतं.या मुहूर्त ट्रेडिंग सेशनदरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला. आज दिवसभरात १०१६ शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. तर २८४ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. तर ८५ शेअर्समध्ये कोणताही बदल झाल्याचे दिसून आला नाही.

शेअर बाजार सुरू होण्याआधी देखील चांगले संकेत मिळाले होते. सेन्सेक्स ०.१९ टक्क्यांनी म्हणजे ८४,५२१.२२ पर्यंत पोहोचला होता.तर निफ्टी ०.३० टक्क्यांनी वाढून २५,९२०.६५ वर पोहोचला होता. त्यानंतर ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी मजबूत स्थितीत दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com