Business Ideas In Marathi: महिलांसाठी ४ घरगुती व्यवसाय; घरी बसून महिन्याला कमवा लाखो रुपये, वाचा सविस्तर

Business Ideas In Marathi : व्यवसाय करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलांना घरगुती व्यवसाय करून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी व्यवसायाच्या ४ आयडिया आहेत. जाणून घेऊयात.
Money
MoneySaam TV
Published On

business idea for women in marathi 2023:

सध्याच्या युगात बहुतेक महिला, तरुणी पैशांसाठी इतरांवर अवलंबून राहण्यास इच्छुक नाही. आता गृहीणांनाही खर्चाला हातात पुरेसे पैसे हवेत, असं वाटत असतं. अनेक महिला, तरुणी या वेळोवेळी व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असतात. व्यवसाय करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महिलांना घरगुती व्यवसाय करून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी व्यवसायाच्या ४ आयडिया आहेत. जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

आता काही घरगुती व्यवसायातून घरबसल्या लाखो रुपयांची कमाई करता येऊ शकते. अशा अनेक वेगवेगळ्या आयडिया आहेत, त्यातून महिला घरातील कामे सांभाळून लाखो रुपयांची कमाई करू शकतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Money
Narayana Murthy: 'मी स्वत: आठवड्याला ८५ ते ९० तास काम केलंय'; नारायण मूर्तींचं कामाच्या तासांवरील वक्तव्य पुन्हा चर्चेत

लोणचे तयार करून विका

आपल्या देशात बहुतांश लोकांना जेवणात लोणचे खाणे आवडते. हिवाळा असो किंवा पावसाळा अनेक लोकांना जेवणासोबत चवीला लोणचं लागतंच. त्यामुळे लोणचे तयार करून त्याची विक्री केल्यास चांगली कमाई करू शकता.

तुम्ही लोणचं तयार करून त्याचं सॅम्पल आजूबाजूच्या दुकानात दाखवू शकता. दुकानदाराला लोणच्याचं सॅम्पल आवडल्यास तो ऑर्डर देऊ शकतो. तसेच तुम्ही लोणचं ऑनलाइनही विकू शकतात.

जेवणाचा डबा पुरवणे

शिक्षण आणि रोजगारासाठी अनेक जण स्वत:चं शहर सोडून इतर ठिकाणी जातात. दुसऱ्या शहरात काही काळासाठी राहण्यास गेल्यास त्यांना दररोज हॉटेलात जाऊन जेवायला लागतं. मात्र, अनेकांना हॉटेलातील जेवण रुचत नाही. त्यामुळे ते घरगुती पद्धतीच्या जेवणाच्या शोधात असतात.

अशा लोकांसाठी तुम्ही घरपोच जेवणाचा डबा पुरवण्याचा व्यवसाय करू शकतात. जेवणाचा डबा पुरविण्याच्या व्यवसायातून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. पीजी, बॅचलर लोकांकडून जेवणाच्या डबा पुरविण्याची ऑर्डर घेऊ शकता.

कँटिनसाठी जेवण तयार करणे

पँट्री आणि कँटिनमध्ये जाऊन जेवण तयार करणे हा देखील पैसा कमावण्याचा चांगला मार्ग असू शकतो. कँटिनची सेवा पुरवणारे लोक तुम्हाला काही लोकांचे जेवण बनविण्याची ऑर्डर देऊ शकतात. त्याप्रमाणे ऑर्डरनुसार तुम्हाला लोकांचं जेवण तयार करायला लागेल. त्यातून तुमची चांगली कमाई होऊ शकते.

Money
Business Ideas In Marathi: भांडवल ४ हजार, महिन्याला कमाई १ लाख; तरुणी अवघ्या २ महिन्यात झाल्या मालामाल

फूड व्लॉग

आजकाल लोकांना जेवणाचे व्हिडिओ पाहायला फार आवडतात. तुम्ही फूड व्लॉग तयार करून पैसे कमावू शकतात. यासाठी तुम्हाला जेवण तयार करतानाचा व्हिडिओ तयार करून तो युट्यूबवर शेअर करावा लागेल.

जशजशी तुमचे युट्यूब चॅनलवर सब्सक्राइबर आणि Views संख्या वाढेल. त्यानुसार युट्यूबकडून पैसे मिळू शकतात. या माध्यमातून दर महिन्याला तुम्ही चांगली कमाई करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com