DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांची 'धन धना धन दिवाळी'...; मोदी सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट?

DA Hike News Update : केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची यंदाची दिवाळी रोषणाईनं उजळून निघणार आहे.
DA Hike Update News
DA Hike Update NewsSAAM TV
Published On

7th Pay Commission Update :

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची यंदाची दिवाळी रोषणाईनं उजळून निघणार आहे. त्यांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून नोकरदारांना महागाई भत्त्यातील वाढीच्या स्वरुपात 'दिवाळीची गोड भेट' मिळण्याची शक्यता आहे.

दसऱ्यापर्यंत महागाई भत्ता वाढीबाबतची घोषणा होण्याची शक्यता यापूर्वी व्यक्त केली जात होती. परंतु, ताज्या रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारकडून दिवाळीलाच मोठं गिफ्ट मिळू शकतं. महागाई भत्त्यात यावेळी ४ टक्क्यांची वाढ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

केंद्रातील मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली तर, ते ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल. महागाई भत्त्यातील वाढीबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाल्याचे पाहायला मिळेल. मात्र, डीए वाढीबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दिवाळीला सरकार डीए वाढीबाबत घोषणा करू शकतं, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ केली जाते. त्याचा लाभ जानेवारी आणि जुलैपासून दिला जातो. सन २०२३ मध्ये सरकारने पहिल्यांदा २४ मार्च २०२३ रोजी महागाई भत्त्यात वाढ केल्याची घोषणा केली होती. त्याचा लाभ कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना १ जानेवारी २०२३ पासून दिला जात आहे.

केंद्र सरकारने त्यावेळी महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के केला होता. आता दिवाळीला सरकारने महागाई भत्त्यात वाढीची घोषणा केली तर, कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ १ जुलै २०२३ पासून मिळेल.

DA Hike Update News
Gold Price Hike : सणासुदीत सोनं बजेटबाहेर जाणार; किंमत ६० हजारांचा टप्पा ओलांडणार, कारण...

वेतन आणि महागाई भत्त्याचं कॅल्क्युलेशन...

सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ केली तर, १८००० रुपये बेसिक- पे असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ७५६० रुपयांवरून ८१०० रुपये होईल. म्हणजेच वेतनात ५४० रुपयांची वाढ होईल.

तसेच महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ झाल्यास तो ८२८० रुपये होईल. वेतनात ६९० रुपयांची वाढ होईल. जास्तीत जास्त बेसिक पेच्या आधारे हिशेब केला तर, ५६९०० रुपयांवर ४५ टक्के डीए म्हणजेच २३८९८ रुपयांवरून तो २५६०५ रुपये होईल. तर ४६ टक्क्यांच्या हिशेबाने तो २७५५४ रुपये होईल.

DA Hike Update News
Petrol Diesel Price (12th October) : कच्च्या तेलाच्या दरात घसरण, १ लीटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागतील? जाणून घ्या राज्यातील नवे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com