
JSW MG मोटर इंडियाने आज भारतीय बाजारात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च केलीय. कंपनीने MG Comet EV ला नवीन अवतारात बाजारात उतरवलंय. या कारच्या सर्व वेरिएंटमध्ये अपडेटेड फीचर्स देण्यात आले आहेत, यामुळे ही या कारची आवृत्ती मागील मॉडेलपेक्षा अधिक उजवी ठरतेय. या इलेक्ट्रिक कारची किंमत कंपनीने फक्त 4.99 लाख रुपये ठेवलीय. या कारची बेस प्राईस 4.99 लाख आहे.
कंपनीने नवीन MG Comet ची अधिकृत बुकिंगही सुरू केलीय. या छोट्या इलेक्ट्रिक कारची बुकिंग करायची असेल तर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे 11,000 रुपये देऊन बुकिंग करू शकतात. ही कार नवीन ब्लॅकस्टॉर्म एडिशनमध्येही विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. चला तर मग पाहूया नवीन कारमध्ये काय विशेष फीचर्स देण्यात आली आहेत.
कॉमेट ईव्ही कुल ५ व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. यात एक्झिक्युटिव्ह, एक्साइट, एक्साइट फास्ट चार्ज, ए क्सक्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह फास्ट चार्ज यांचा समावेश आहे. एक्साईट आणि एक्साइट फास्ट चार्ज व्हेरियंटमध्ये आता रियर पार्किंग कॅमेरा आणि पॉवर-फोल्डिंग आऊट रीअरव्ह्यू मिरर्स (ORVMs) देण्यात आली आहेत.
जे या कारच्या सुरक्षिततेत आणखी सुधारणा करतात. एक्सक्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह फास्ट चार्ज व्हेरियंटमध्ये केबिनमध्ये आरामदायक वाटतं. प्रीमियम लेदरेट सीट्स आणि 4-स्पीकर ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहेत. फास्ट चार्जिंग व्हेरिएंट 17.4 kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे. कारला एकदा चार्ज केलं की, कार 230 किमी (IDC) पर्यंतची रेंज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.
फेब्रुवारी 2025 मध्ये, MG मोटरने मॉडेल रेंज वाढवत असताना कॉमेट ब्लॅकस्टॉर्म एडिशनला बाजारात आणलंय. ही कार बॅटरी-एज-ए-सर्व्हिससह 7.80 लाख रुपयांच्या किमतीत येते. या स्पेशल एडिशन व्हेरियंटमध्ये गडद क्रोम एलिमेंट्स, ब्लॅक बॅज आणि लाल ॲक्सेंटसह ‘स्टारी ब्लॅक’ बाह्य भाग आहे.
MG Comet EV मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), मागील बाजुस पार्किंग सेन्सर्स, स्पीड-सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस), रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, फॉलो मी होम हेडलॅम्प, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आली आहेत.
कंपनीने कारच्या केबिनमध्ये लेदरेट सीट्स, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, इलेक्ट्रॉनिकली ऍडजस्टेबल ORVM आणि चार-स्पीकर ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.