इंटरनेटवर मुलांचे शोषण करू पाहणाऱ्या विकृत प्रवृत्ती एकाच प्लॅटफॉर्मपुरत्या मर्यादित राहत नाहीत. हे निष्णात गुन्हेगार तपास यंत्रणांचे लक्ष चुकवण्यासाठी सतत नवनवीन प्लॅटफॉर्म्स आणि पद्धतींचा अवलंब करत असतात. या आव्हानाचा सामना करण्यासाठी मेटाने आपली सुरक्षा साधने आणि टूल्स सतत विकसित करत आहे. तसेच, या क्षेत्रातील इतर उद्योगांसोबत सुरक्षेशी संबंधित सिग्नल्स शेअर केले जात असून, अशा गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मेटाकडून कायदा अंमलबजावणी संस्थांकडे (Law Enforcement Agencies) त्यांची तक्रार केली जात आहे.
जानेवारी ते जून 2026 दरम्यान मेटाकडून जागतीक स्तरावर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील 33.2 दशलक्ष बाल लैंगिक शोषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात आली आहे . तर याच कालावधीत भारतात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाच्या ५.३ दशलक्ष कंटेंट घटकांवर कारवाई करण्यात आली आहे . यातील 98 टक्क्यांपेक्षा जास्त कंटेंटवर मेटाने वापरकर्त्याची तक्रार येण्यापूर्वीच सक्रियपणे कारवाई करण्यात आली.
चाइल्ड सेक्शुअल एक्स्प्लॉइटेशन मजकूराच्या साइनपोस्टिंगचा शोध घेण्यासाठी तसेच प्लॅटफॉर्मबाहेरील वापरकर्त्यांना बेकायदेशीर लिंककडे वळवणाऱ्या जाहिराती शोधण्यासाठी मेटाकडून नवीन लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) आणि AI तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे
एखादी जाहिरात केवळ काय दाखवते एवढेच नव्हे, तर वापरकर्त्यांना नेमके कुठे घेऊन जाते याची अधिक सखोल माहिती मिळवणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लिंक्स ब्लॉक करून जबाबदार अकाउंट्सवर कारवाई करणे त्याचबरोबर सुरक्षेतील उणिवा शोधण्यासाठी आणि नव्या ट्रीक्स पसरण्यापूर्वीच त्या रोखण्यासाठी मेटाने एआय एजंटची नियुक्ती केली आहे.
संशयास्पद वर्तणूक पद्धतींमध्ये गुंतलेले अकाउंट्स शोधण्यासाठी मेटाडेटा आणि वर्तणुकीशी संबंधित संकेतांच्या संयोजनाची छाननी केली जाणार आहे.
केवळ वैयक्तिक अकाउंट्सवर कारवाई न करता संपूर्ण गुन्हेगारी आणि नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी मॅन्युअल तपास केला जाणार आहे .
2011 पासून वापरल्या जाणाऱ्या 'PhotoDNA' आणि हॅश डेटाबेसद्वारे संशयित फोटो/व्हिडिओ शोधून ते ब्लॉक केले जाणार असल्याचे मेटाने सांगितले आहे . मेटा अशा इमेज आणि व्हिडिओ हॅशचा उद्योग क्षेत्रातील सर्वात मोठा डेटाबेस राखते. नव्याने शोधलेले हॅशटॅग यामध्ये जोडून आणि त्यानंतर टेक कोलिशनच्या लँटर्न प्रोग्रामद्वारे हे हॅश उद्योग क्षेत्रातील इतर घटकांसोबत शेअर केले जातील. ज्यामुळे इतर सहभागी कंपन्या देखील असा कंटेंट हटवू शकतील आणि संपूर्ण इंटरनेट अधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल. मेटा याच तंत्रज्ञानाचा वापर बाह्य लिंक्सच्या प्रिव्ह्यूमध्ये SCAM कंटेंट शोधण्यासाठीही करते. या मॅचिंग तंत्रज्ञानाद्वारे ओळखला गेलेला सर्व SCAM कंटेंटवर कायद्यानुसार NCAMEC च्या मदतीने कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच मेटाने नियमांचे उल्लंघन करणारा SCAM कंटेंट होस्ट करणाऱ्या किंवा तयार करणाऱ्या बाह्य वेबसाइट्सच्या लिंक्स ब्लॉक करण्याचे काम करणार आहे. एकदा एखादी लिंक ब्लॉक झाल्यानंतर, ती लिंक असलेले इतर सर्व कंटेंट जसे, जाहिराती, पोस्ट्स किंवा कमेंट्स शोधून ते हटवण्याचे काम मेटा करणार आहे.
एखादी व्यक्ती फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेड्सवर अशा ब्लॉक केलेल्या लिंक्स असलेला कंटेंट पोस्ट करू शकणार नाहीत यासाठी मेटा उपाययोजना करणार आहेत. तसेच ब्लॉक केलेल्या लिंक्स असलेल्या जाहिराती अपलोड करतानाच त्या नाकारल्या जातील याची काळजी घेतली जाणार आहे . तसेच, ह्युरिस्टिक्स-आधारित नियम, ज्यामध्ये जाहिरातींसह नव्याने समोर येणाऱ्या नियम उल्लंघनांच्या पद्धती सक्रियपणे ओळखण्यासाठी आणि त्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यासाठी ऑटोमेटेड क्लासिफायर्स, एआय मॉडेल्स आणि इतर संकेतांचे संयोजन मेटाकडून केले जाणार आहे.
मेटाने या प्रकरणांची माहिती नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉइटेड चिल्ड्रन (NCMEC) कडे दिली आहे. तसेच सप्टेंबरपासून भारतीय कायदा अंमलबजावणी संस्थांच्या सहकार्यासाठी ही माहिती थेट I4C च्या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर (cybercrime.gov.in) शेअर करण्यास सुरुवात केली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.