Maharashtra Investment: मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात करणार मोठी गुंतवणूक, रोजगारात मोठ्या संख्येने होणार वाढ

Mercedes-Benz : आघाडीची कार उत्पादक कंपनी मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात 3000 कोटींची गुंतवणूक करणार, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात करणार मोठी गुंतवणूक, रोजगारात मोठ्या संख्येने होणार वाढ
Mercedes-Benz Will Invest in MaharashtraSaam Tv

एक मोठी बातमी समोर आली आहे. आघाडीची कार उत्पादक कंपनी मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. मर्सिडिझ बेंझ कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार, असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात करणार मोठी गुंतवणूक, रोजगारात मोठ्या संख्येने होणार वाढ
BS Yediyurappa: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना होणार अटक? POCSO प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी

मर्सिडिझ बेंझच्या गुंतवणुकीबाबत माहिती देताना उदय सामंत ट्वीट करत म्हणाले आहेत की, ''आज जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासंदर्भात आज चर्चा झाली.''

मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात करणार मोठी गुंतवणूक, रोजगारात मोठ्या संख्येने होणार वाढ
NEET-UG 2024 Scam: NEET परीक्षेतील घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, काँग्रेसची मागणी

सामंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीला मर्सिडीज कंपनीचे मर्सिडीज-बेंझ ग्रुप ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे सदस्य डॉ. जोर्ग बर्झर, पॉलिटिकल ऑपरेशन्स - एक्सटर्नल अफेयर्स, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक श्रीमती मरिना क्रेट्स, विक्री आणि विपणन, प्रदेश ओव्हरसीज, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक श्री. मार्टिन शुल्झ, मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कार्यकारी संचालन प्रमुख व्यंकटेश कुलकर्णी आदी उपस्थितीत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com