Diwali Car Offers: दिवाळी धमाका! मारुती कंपनीच्या 'या' कारवर तब्बल 2 लाखांपर्यंतची सूट

Maruti Grand Vitara: मारुती ग्रँड विटारा ही तिच्या सेगमेंटमधील अत्याधुनिक हायब्रिड एसयूव्ही असून, उत्कृष्ट मायलेज आणि वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते. आता कंपनी ₹१.८० लाखांपर्यंतची सूट देत असल्याने खरेदीसाठी उत्तम संधी उपलब्ध आहे.
MARUTI GRAND VITARA DIWALI OFFER GET UP TO ₹1.8 LAKH DISCOUNT ON INDIA’S MOST ADVANCED HYBRID SUV
MARUTI GRAND VITARA DIWALI OFFER GET UP TO ₹1.8 LAKH DISCOUNT ON INDIA’S MOST ADVANCED HYBRID SUV
Published On

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने(Maruti Suzuki) सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या लोकप्रिय प्रीमियम एसयूव्ही ग्रँड विटारावर मोठ्या सवलतींची घोषणा केली आहे. कंपनीने ऑक्टोबर २०२५ साठी नेक्सा डीलरशिपवर या ऑफर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्यामध्ये व्हेरिएंटनुसार लाभ वेगवेगळे आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रँड विटाराच्या स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटवर ग्राहकांना ₹१.८० लाखांपर्यंतची बंपर सूट मिळणार आहे. पेट्रोल व्हेरिएंट खरेदी करणाऱ्यांना ₹१.५० लाखांपर्यंतचा फायदा मिळेल. तसेच ₹५७,९०० किंमतीचा विशेष डोमिनियन एडिशन अॅक्सेसरी पॅक मोफत दिला जाणार आहे. सीएनजी व्हेरिएंटसाठीही ₹४०,००० पर्यंत सूट देण्यात येणार आहे. ही एसयूव्ही सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून तिची एक्स-शोरूम किंमत आता ₹१०.७६ लाखांपासून सुरू होते.

MARUTI GRAND VITARA DIWALI OFFER GET UP TO ₹1.8 LAKH DISCOUNT ON INDIA’S MOST ADVANCED HYBRID SUV
Royal Enfield Hunter 350 आणि Ronin कोणती बाईक आहे दमदार? जाणून घ्या फिचर्स अन् किंमती

ग्रँड विटारा ही कार मारुती सुझुकीने टोयोटासोबतच्या सहकार्याने विकसित केली आहे. ती टोयोटाच्या अर्बन क्रूझर हायराइडरसारख्या इंजिन पर्यायांनी सुसज्ज आहे. यात १४६२ सीसी K१५ पेट्रोल इंजिन बसवले गेले असून ते ६००० RPM वर साधारण १०० bhp आणि ४४०० RPM वर १३५ Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल तसेच ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. ऑल-व्हील ड्राइव्हचा पर्यायही दिला गेला आहे. ज्यामुळे ही कार आपल्या सेगमेंटमधील अत्याधुनिक मॉडेलपैकी एक ठरते.

MARUTI GRAND VITARA DIWALI OFFER GET UP TO ₹1.8 LAKH DISCOUNT ON INDIA’S MOST ADVANCED HYBRID SUV
GST Reforms: ८ दिवसांत ४,००,००० वाहनांची विक्री, GST कपातीमुळे कार आणि दुचाकी विक्रीत जबरदस्त वाढ

ग्रँड विटाराची लोकप्रियता तिच्या शक्तिशाली हायब्रिड इंजिनमुळे आहे. जे पेट्रोल इंजिनसह इलेक्ट्रिक मोटरचे संयोजन करते. ही मोटर कारला गरजेनुसार अतिरिक्त पॉवर देण्याबरोबरच बॅटरीला सतत चार्ज ठेवण्याचे काम करते. ज्यामुळे कार स्वतःची बॅटरी स्वतः चार्ज करू शकते. कंपनीचा दावा आहे की तिची इंधन बचत प्रति लिटर २७.९७ किमी आहे आणि ती एका टँकवर 1200 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. या सवलती आणि तांत्रिक वैशिष्ट्यांमुळे ग्रँड विटारा सणासुदीच्या काळात एसयूव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठा पर्याय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com