
महाराष्ट्र सरकारने अत्याचारातील पीडित मुली, तरुणी आणि बालकांसाठी एक योजना सुरु केली आहे. या योजनेचं नाव मनोधैर्य योजना आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक मदत आणि समुपदेशन दिले जाते जेणेकरुन त्यांना मानसिक आधार मिळतो. सोलापूर जिल्ह्यातील पीडित महिलांना मागील चार वर्षीत एक कोटी ११ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
ज्या महिलांवर अत्याचार झाला आहे त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत ५० टक्के तरतूद ही केंद्र शासनाद्वारे तर ५० टक्के रक्कम राज्य शासनाद्वारे दिली जाते.
काय आहे मनोधैर्य योजना? (What is Manodhairya Yojana)
या योजनेत बलात्कार, लैगिंक अत्याचार, अॅसिड हल्ला यामधील पीडित महिलांना मदत केली जाते. २०१३ मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती.यामध्ये महिलांना व बालकांना या आघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांना वित्तीय मदत केली जाते. याचसोबत समुपदेशन वैद्यकीय आणि कायदेशीर मदत केली जाते.
या योजनेअंतर्गत बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात किमान दोन लाखांची मदत केली जाते. विशेष प्रकरणांमध्ये ३ लाख रुपे दिले जातात. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांना किंवा बालकांना चेहरा विद्रुप झाल्यावर तीन लाख रुपये दिले जाते. तर इतर जखमा झालेल्या महिलांना व लहान मुलांना ५० हजार रुपये दिले जाते.
अर्ज कुठे करावा? (Application Process For Manodhairya Yojana)
मनोधैर्य योजनेत पीडितांना तीन ते दहा लाखांची मदत केली जाते. याचसोबत वैद्यकीय उपचार मोफत केले जातात. या योजनेसाठी पीडित महिलांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागात अर्ज केले जातात. अर्ज मिळाल्यापासून सात दिवसांत पीडितेला मदत केली जाते.काही रक्कम लगेच दिली जाते तर उरलेली रक्कम बँकेत ठेवी म्हणून ठेवली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.