Petrol Diesel Price (3 Aug): कच्चा तेलाच्या दरात उसळी, महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं; वाचा नवे दर...

Maharashtra Petrol Diesel Price: गुरूवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. परिणामी महाराष्ट्रासह पंजाबमध्ये पेट्रोल डिझेल महागलं आहे.
Maharashtra Petrol Diesel Price 3 August 2023
Maharashtra Petrol Diesel Price 3 August 2023Saam TV
Published On

Maharashtra Petrol Diesel Price 3 August 2023: पेट्रोल डिझेलचे दर आंतराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारभूत असतात. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार दिसून येत आहे.

याचा परिणाम भारतातील इंधन कंपन्यांवर होताना दिसून येत आहे. गुरूवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. परिणामी महाराष्ट्रासह पंजाबमध्ये पेट्रोल डिझेल महागलं आहे.

Maharashtra Petrol Diesel Price 3 August 2023
Gold Silver Rate (2nd August): खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! सोन्याचा भाव नरमला; चांदीच्या दरातही घसरण, जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचा भाव मुसंडी मारत आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८३.३२ डॉलरवर पोहचली असून गुरूवारी क्रूडच्या किमतीत वाढ झाली. दरम्यान, कच्चा तेलाच्या दरात वाढ होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे भाव जारी केले आहेत.

इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या नवीन दरानुसार, आज महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात ३५ पैशांनी तर डिझेलच्या दरात ३३ पैशांनी वाढ झाली आहे. पंजाबमध्ये पेट्रोल ३२ पैशांनी तर डिझेल ३० पैशांनी महागलं आहे. याशिवाय तेलंगणामध्ये पेट्रोल १.५५ रुपयांनी तर डिझेल १.४५ रुपयांनी महागलं आहे.

Maharashtra Petrol Diesel Price 3 August 2023
Share Market Closing: शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटींचे नुकसान...

दुसरीकडे राजस्थानमध्ये पेट्रोलच्या दरात १४ पैशांची आणि डिझेलच्या दरात १२ पैशांची घट झाली आहे. पश्‍चिम बंगालमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे. अचानक पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहनधारकांना मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्रातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोलचा भाव ९६.७२ रुपये, तर डिझेलचा भाव ८९.६२ रुपये इतका आहे.

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये दराने विकले जात आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोलचा भाव १३२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव ९४.३३ रुपये प्रति लिटर आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com